दहावी-बारावीच्या पुरवणी परीक्षेचे वेळापत्रक बोर्डाकडून जाहीर, ‘या’ दिवशी होणार लेखी

नुकताच दहावी (Tenth) आणि बारावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मुलींनी बाजी मारली आहे. मुलांच्या तुलनेत मुलींचे पास होण्याचे प्रमाण जास्त आहे. निकालानंतर पुरवणी परीक्षेसाठी (Supplementary Examination) अर्ज भरून घेतले होते. आता महाराष्ट्र राज्य माध्यमिक (Maharashtra State Secondary) आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून दहावी-बारावीच्या पुरवणी परीक्षेचं वेळापत्रक जाहीर केले आहे. (Latest Marathi News)

सावधान! तासाभरात उतरत असेल फोनची बॅटरी तर तातडीने डिलीट करा ‘ही’ धोकादायक Apps

त्यानुसार आता इयत्ता बारावीची लेखी परीक्षा मंगळवार 18 जूलै 2023 ते शनिवार 5 ऑगस्ट 2023 या कालावधीत तर इयत्ता दहावीची लेखी परीक्षा मंगळवार 18 जुलै ते मंगळवार 1 ऑगस्ट 2023 या कालावधीत पार पडणार आहे. बोर्डाने www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर वेळापत्रक उपलब्ध करुन दिले आहे. परंतु शाळा आणि महाविद्यालयाकडे छापील स्वरुपात देण्यात येणारे वेळापत्रक अंतिम राहणार आहे.

टायटॅनिक दाखवायला गेलेली ‘ती’ पाणबुडी माघारी आलीच नाही; पाच जण बुडाल्याची भीती

तसेच दहावीची प्रात्यक्षिक परीक्षा, श्रेणी, तोंडी आणि अंतर्गत मूल्यमापन परीक्षा मंगळवार 18 जुलै 2023 ते मंगळवार 1 ऑगस्ट 2023 रोजी होणार आहे. इ. बारावीची प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी व अंतर्गत मूल्यमापन परीक्षा मंगळवार 18 जुलै 2023 ते शनिवार 5 ऑगस्ट 2023 या कालावधीत आयोजित केली आहे. त्यामुळे संबंधिताकडून याबाबत नोंद घेण्यात यावी, असे राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

Delhi । दिल्लीत मेट्रोमध्ये तरुणीने केले असे कृत्य की.., व्हिडिओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *