उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी पहाटेच्या शपथविधीवरून शरद पवार (Sharad Pawar) यांनी डबल गेम केल्याने आम्हाला पहाटेचा शपथविधी घ्यावा लागला, असा खळबळजनक गौप्यस्फोट यांनी केला आहे. त्यावरून त्यांना आता टीकेचा सामना करावा लागत आहे. तेव्हा काय झालं? काय नाही? हे आता महत्त्वाचं नाही. परंतु त्यावेळी तुमचा प्रयोग फसला ही एका ओळीची गोष्ट आहे, असा खरपूस समाचार खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी घेतला आहे. (Latest Marathi News)
ठाकरे गट आणि शिंदे गट पुन्हा भिडले, पोलिसांकडून आंदोलनकर्ते ताब्यात
Devendra Fadnavis,Sharad Pawar,Sanjay Raut,Latest Marathi News,Uddhav Thackeray,
राऊत माध्यमांशी बोलताना म्हणले की, शिंदे-फडणवीस सरकार हे काही औटघटकेचं सरकार आहे. हे सरकार पडत आहे. त्यामुळे फडणवीस यांच्याकडे कोणताही नवा मुद्दा नाही. ते झोपेत किंवा जागेपणी बोलत असतील. त्यांच्याकडे लक्ष देऊ नका. जरी शरद पवार यांनी काही गोष्टी केल्या असतील तर त्या योग्य केल्या असतील.
खरेदीदारांसाठी सुवर्णसंधी! सोन्याच्या किमतीत खूप मोठी घसरण, जाणून घ्या नवीनतम दर
शरद पवार यांच्या पूर्ण पाठिंब्यामुळे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले, हे सत्य आहे. त्यामुळे डबल गेमची गोष्ट सोडा. तेव्हा काय झालं? काय नाही? हे आता महत्त्वाचं नाही. परंतु त्यावेळी तुमचा प्रयोग फसला ही एका ओळीची गोष्ट आहे. तुमचा प्रयोग तुमच्या अंगलट आला, अशी बोचरी टीका राऊत यांनी केली आहे.
मिंधे गटातील बेइमानांना वाचविण्यासाठी ‘मोदी सरकार’ चे प्रयत्न सुरु; ठाकरे गटाची जहरी टीका