विठ्ठलाच्या दर्शनाला जाणाऱ्या भाविकांवर काळाचा घाला, भीषण अपघातात एक जागीच ठार तर ६ जण जखमी

Accident

संपूर्ण राज्यात आज आपल्याला आषाढी एकादशीचा (Ashadhi Ekadashi) जल्लोश पाहायला मिळत आहे. एकीकडे विठूनामाच्या गजरात भक्तिमय वातावरण पाहायला मिळत आहे तर दुसरीकडे या आनंदात विरजण पडले आहे. विठ्ठलाच्या दर्शनासाठी येत असणाऱ्या एका गाडीचा (Car Accident) वाटेतच अपघात झाला आहे. हा अपघात इतका भीषण होता की यामध्ये एक भाविक जागीच ठार झाला आहे. (Latest Marathi News)

फडणवीसांच्या गौप्यस्फोटानंतर संजय राऊतांचे मोठे वक्तव्य; म्हणाले “तुमचा प्रयोग…”

मिळालेल्या माहितीनुसार, पंढरपूरला (Pandharpur) विठ्ठलाच्या दर्शनासाठी जात असणाऱ्या बोलेरो गाडीचा अपघात झाला. एका गाडीला ओव्हरटेक करत असताना बोलेरो गाडी रस्त्यावर आदळली. त्यामुळे चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटून ती रस्त्याच्या कडेला गेली. हा अपघात इतका भीषण होता की यात 6 प्रवासी जखमी तर चालकाचा जागीच मृत्यू झाला आहे. कल्याण भोसले असे मृताचे नाव आहे.

ठाकरे गट आणि शिंदे गट पुन्हा भिडले, पोलिसांकडून आंदोलनकर्ते ताब्यात

हे सर्व प्रवासी कोरेगाव (Koregaon) तालुक्यातील गुजरवाडी गावचे रहिवासी आहे. दरम्यान या अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी जखमींना उपचारासाठी सातारा येथील खाजगी रुग्णालयात नेले आहे.

खरेदीदारांसाठी सुवर्णसंधी! सोन्याच्या किमतीत खूप मोठी घसरण, जाणून घ्या नवीनतम दर

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *