Navneet Rana । लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित अशा अमरावती लोकसभा मतदारसंघातील (Amravati Lok Sabha Constituency) हायुतीतल्या अडचणी काही केल्या कमी होत नाहीत. भाजपने या मतदारसंघातून नवनीत राणा यांना उमेदवारी दिली आहे. पण नवनीत राणांच्या अडचणीत वाढ झाली आहे. कारण महायुतीतल्या तिसऱ्या बड्या नेत्याने नवनीत राणांविरोधात दंड थोपटले आहेत. (Latest marathi news)
Crime News । अत्याचाराच्या घटनेनं बीड जिल्हा हादरला! एकटेपणाचा फायदा घेत घरात आला आणि…
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते संजय खोडके (Sanjay Khodke) यांनी नवनीत राणा यांनी छापलेल्या पोस्टरवर आक्षेप घेतला असून नवनीत राणा यांनी परवानगीशिवाय फोटो वापरल्याचा आरोप संजय खोडके (Sanjay Khodke vs Navneet Rana) यांनी केला आहे. नवनीत राणा यांनी विनापरवाना फोटो वापरून आचारसंहितेचा भंग केला असल्याने राणा यांनी तातडीने फोटो काढून खुलासा करावा, नाहीतर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा संजय खोडके यांनी दिला आहे.
Uddhav Thackeray । राजधानी दिल्लीत उद्धव ठाकरेंनी भाजपला दिलं खुलं आव्हान, म्हणाले; “हिंमत असेल तर…”
इतकेच नाही तर नवनीत राणा यांना उमेदवारी मिळाल्यानंतर शिवसेनेचे नेते आनंदराव अडसूळ (Anandrao Adsul) यांनी आपण नवनीत राणांचा प्रचार करणार नसल्याची भूमिका घेतली. प्रहार संघटनेचे आमदार बच्चू कडू यांनी देखील अमरावतीतून दिनेश बुब उमेदवार असतील अशी घोषणा केली आहे. त्यामुळे या मतदारसंघात निवडणुकीपूर्वीच नवनीत राणा यांची डोकेदुखी वाढली आहे.
Supriya Sule । सुप्रिया सुळे यांचा सर्वात गंभीर आरोप; म्हणाले, “माझ्या सुनेत्रा वहिनीला…”