Crime News । अत्याचाराच्या घटनेनं बीड जिल्हा हादरला! एकटेपणाचा फायदा घेत घरात आला आणि…

Crime News

Crime News । बीड : राज्यात दिवसेंदिवस अत्याचाराचे प्रमाण (Crime) वाढत चालले आहे. धक्कादायक बाब म्हणजे गुन्हेगारांच्या यादीत अल्पवयीन मुलांचा देखील समावेश आहे. काही दिवसांपूर्वीच ऊसतोड मजुराच्या अल्पवयीन मतीमंद मुलीवर अत्याचार केल्याची घटना समोर आली होती. अशातच आता सातवीच्या वर्गातील अल्पवयीन मुलीवर गावातीलच तरुणाने अत्याचार केल्याची घटना घडली आहे. (Latest marathi news)

Uddhav Thackeray । राजधानी दिल्लीत उद्धव ठाकरेंनी भाजपला दिलं खुलं आव्हान, म्हणाले; “हिंमत असेल तर…”

याबाबत अधिक माहिती अशी की, बीडच्या केज तालुक्यात ही संतापजनक घटना घडली आहे. सातवीत शिकणाऱ्या 13 वर्षीय अल्पवयीन मुलीवर शाळेतून घरी आल्यानंतर दुपारी 2 वाजेच्या सुमारास त्याच गावात राहणाऱ्या तरुणाने तिच्यावर बळजबरीने अत्याचार केला. इतकेच नाही तर घडलेला प्रकार कोणाला सांगितला तर जिवे मारले जाईल, अशी धमकी देखील त्या आरोपीने पीडित मुलीला दिली.

Supriya Sule । सुप्रिया सुळे यांचा सर्वात गंभीर आरोप; म्हणाले, “माझ्या सुनेत्रा वहिनीला…”

पीडितेच्या तक्रारीवरून युसूफ वडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे परिसरातून संताप व्यक्त केला जात आहे. आरोपीला कठोरातली कठोर शिक्षा द्यावी, अशी मागणी पीडितेच्या कुटुंबीयांनी केली आहे. या प्रकरणी अधीक तपास पोलीस करत आहेत. दरम्यान, मागील काही दिवसांपासून अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होत असून त्याला आळा घालणे गरजेचे आहे.

Bjp । भाजपला सर्वात मोठा धक्का; ‘हा’ बडा नेता करणार बंडखोरी

Spread the love