बहुजनांच्या पोरांना भडकावणाऱ्या संभाजी भिडेंना अटक झालीच पाहिजे; छगन भुजबळ यांची मागणी

Bhujbal

शिवप्रतिष्ठान संघटनेचे संस्थापक संभाजी भिडे (Sambhaji Bhide) यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केले आहे. ”15 ऑगस्ट हा खरा स्वातंत्र्य दिवस नाही, अनेकांनी आपल्या प्राणाची आहुती देऊन स्वातंत्र्य मिळवले आहे, वंदे मातरम् म्हणत हे स्वातंत्र्य मिळाले आहे” असे वक्तव्य भिडे यांनी केले होते. त्यावरून राजकीय वातावरण चांगले तापले आहे. यावरून राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी संभाजी भिडे बहुजनांच्या पोरांना भडकवतायेत. त्यामुळे त्यांना अटक करा, अशी मागणी केली आहे. (Latest Marathi News)

Urfi Javed। बॉडीकॉन ड्रेसमुळे उर्फी पुन्हा चर्चेत! चाहत्यांचे वेधले लक्ष

‘जर संभाजी भिडे यांच्या जागी दुसऱ्या कोणी वक्तव्य केले असते तर त्यांना आतापर्यंत देशद्रोही म्हणून अटक झाली असती. संभाजी हे नाव वापरून ते बहुजनांच्या पोरांना भडकवत आहे’. त्यामुळे संभाजी भिडे यांना लवकरात लवकर अटक करण्यात यावी यासाठी छगन भुजबळ आक्रमक झाले आहेत.

‘मुख्यमंत्री लेव्हलचा माणूस लहान मुलांच्या भांडणासारख्या बालिश टीका करत आहे’, एकनाथ खडसेंचा घणाघात

तसेच त्यांनी सदाशिव पेठेत (Sadashiv Peth) तरूणीवर झालेल्या कोयता हल्ल्यावर प्रतिक्रिया दिली आहे. महात्मा फुले यांनी शिक्षणासाठी काम केले. परंतु आता या पुण्यभूमीत काय चालू आहे? पुण्यातील पोलीस आयुक्त काय करत आहेत? यावर कडक कारवाई झाली पाहिजे. आरोपींवर न्यायव्यवस्थेने दया दाखवता कामा नये, अशी संतप्त प्रतिक्रिया भुजबळ यांनी दिली आहे.

‘मतांच्या विभाजनासाठी KCR यांची एन्ट्री; BRS भाजपची टीम बी’ संजय राऊत यांचा आरोप

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *