बॉलीवूडचा दबंग खान म्हणजेच सलमान खान (Salman Khan) नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने खूप चर्चेत असतो. सलमान खानची पर्सनल लाईफ जाणून घेण्यासाठी त्याचे चाहते नेहमीच उत्सुक असतात. दरम्यान, मागच्या काही दिवसांपासून सलमान खानला जीवे मारण्याची धमकी दिली जात होती. त्यामुळे सलमान खानच्या सुरक्षेमध्ये मुंबई पोलिसांकडून मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात आली आहे. मागच्या काही दिवसांमध्ये गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईने (Lawrence Bishnoi) जेलमधूनच माध्यमांसमोर मुलाखत दिली होती. त्यामध्ये त्याने थेट सलमान खानला जीवे मारण्याची धमकीच दिली होती. तो सतत सलमान खानला धमकी देत आहे.
Ajit Pawar। नाराजीच्या प्रश्नावर अजित पवार भडकले; म्हणाले, “आता स्टॅम्प पेपरवर लिहून…”
2010 मध्ये झालेल्या वीर चित्रपटात (Veer movie) सलमान खानने ज्या दिग्दर्शकाबरोबर काम केलं होतं. त्यांनी सलमान बद्दल एक मोठा खुलासा केला आहे. त्या दिग्दर्शकाचे नाव अनिल शर्मा (Anil Sharma) असं आहे. त्यांचा येणारा आगामी चित्रपट गदर 2 (Gadar – 2) मुळे ते खूप चर्चेत आहेत. त्यांनी सलमान खान बद्दल कधीही न ऐकलेली माहिती दिली आहे. ते म्हणाले आहेत की, “सलमान खान बरोबर काम करून मला खरंच खूप मज्जा आली. लोक सतत म्हणतात की तो दारू पितो सतत पार्ट्या करतो पण असं काहीही नाही. ते सगळं बस एक ढोंग आहे जे लोकांनीच पसरवलेलं आहे.
ओमराजे निंबाळकर यांच्यासोबत अपघात की घातपात? समोर आली धक्कादायक माहिती
पुढे अनिल शर्मा म्हणाले की, हो कधी कधी तो रिलॅक्स होण्यासाठी संध्याकाळचा एक-दोन ड्रिंक्स घेतो. एवढेच नाही तर सलमान खान कधीही निगेटिव्ह विचार करत नाही तो निगेटिव्ह गोष्टींपासूनही दूरच असतो. तो फक्त आणि फक्त त्याच्या करिअरवरच लक्ष देतो. तो कधीही कोणाबद्दलही वाईट बोलताना मला दिसला नाही. सलमान खान नेहमी सरळ चालणारा माणूस आहे”. असे देखील अनिल शर्मा म्हणाले आहेत.
शरद पवारांच्या निर्णयावर अजित पवारांनी दिली प्रतिक्रिया; ट्विट करून सांगितली मोठी गोष्ट