Salman Khan Firing Case । मुंबई क्राईम ब्रँचला मोठं यश, सलमान खान गोळीबार प्रकरणी मोठी अपडेट; नदीत सापडल्या बंदुका

Salman Khan

Salman Khan Firing Case । मुंबई क्राईम ब्रँच सलमान खानच्या घराबाहेर झालेल्या गोळीबाराच्या तपासात व्यस्त आहे. आता मोठे यश मिळवत गुन्हे शाखेने गुजरातमधील सुरत येथील तापी नदीतून घटनेत आरोपींनी वापरलेली दुसरी बंदूकही जप्त केली आहे. बंदुकीसोबतच पोलिसांना तीन मॅगझिनही सापडल्या आहेत. अखेर दोन दिवसांच्या शोधमोहिमेनंतर गुन्हे शाखेने गुन्ह्यात वापरलेल्या दोन्ही बंदुका जप्त केल्या आहेत.

Baramati Loksabha । बारामतीच्या राजकारणात मोठी खळबळ! अपक्ष उमेदवाराला मिळालं तुतारी चिन्ह; सुप्रिया सुळेंची निवडणूक आयोगात धाव

दरम्यान सोमवार, 22 एप्रिल रोजी, मुंबई गुन्हे शाखेने उघड केले की, वांद्रे येथील गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये 58 वर्षीय अभिनेता सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार करणाऱ्या नेमबाजांना 10 राऊंड गोळीबार करण्याचे आदेश देण्यात आले होते. तपास यंत्रणेच्या म्हणण्यानुसार, संशयितांनी चौकशीदरम्यान सांगितले की, घटनेनंतर त्यांनी बंदुक सुरतच्या तापी नदीत फेकली होती.

Ajit Pawar । अजित पवारांबाबत बड्या नेत्याचं धक्कादायक विधान; म्हणाले…

मुंबई क्राईम ब्रँचने सांगितले की, “आरोपी विक्की गुप्ता याला सुरत तापी नदीवर नेण्यात आले, तिथे त्याने बंदूक फेकली. पोलीस सध्या या प्रकरणाचा अधिकच तपासही करत आहेत. (Salman Khan Firing Case)

Eknath Shinde । सर्वात मोठी बातमी! भाजपच्या नव्या प्रस्तावाने एकनाथ शिंदेंना बसणार फटका

Spread the love