Jai Pawar । जय पवार यांनी पहिल्यांदाच केली सुप्रिया सुळेंवर जोरदार टीका, म्हणाले…

Jay Pawar

Jai Pawar । सध्या सर्वांचे लक्ष हे बारामती लोकसभा मतदारसंघांमध्ये लागले आहे. कारण या ठिकाणी पवार विरुद्ध पवार अशी लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे. बारामती लोकसभा मतदारसंघात दिवसेंदिवस अनेक मोठ्या घडामोडी घडत आहेत. अजित पवार गट आणि शरद पवार गटावर दोन्ही गट एकमेकांवर टीका करताना दिसत आहेत. सध्या देखील राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र जय पवार यांनी सुप्रिया सुळे यांच्यावर टीका केली आहे. जय पवार हे संसदरत्न फार मोठा पुरस्कार नसल्याचे म्हणाले आहेत.

Baramati Loksabha । बारामतीच्या राजकारणात मोठी खळबळ! अपक्ष उमेदवाराला मिळालं तुतारी चिन्ह; सुप्रिया सुळेंची निवडणूक आयोगात धाव

जय पवार म्हणाले, “आज त्या म्हणत आहेत की मला संसदरत्न मिळाला आहे. मात्र भोर तालुक्याला काय मिळालं? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. संसदरत्न पुरस्कार हा मोठा पुरस्कार नाही. सरकारचा पुरस्कार नाही तो पुरस्कार एका एनजीओच्या माध्यमातून दिला जातो. अशी जोरदार टीका जय पवार यांनी सुप्रिया सुळे यांच्यावर केली आहे. पहिल्यांदाच त्यांनी अशी टीका केली आहे.

Ajit Pawar । अजित पवारांबाबत बड्या नेत्याचं धक्कादायक विधान; म्हणाले…

जय पवार यांनी रॅली काढत असताना हा प्रश्न उपस्थित केला होता. तुम्ही अनेक वर्षापासून सुप्रिया ताईंना निवडून देत आहात. मात्र जशी काम व्हायला हवी होती तशी काम झाली नाहीत असे देखील जय पवार म्हणाले आहेत. आता या टीकेला सुप्रिया सुळे काय उत्तर देणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Eknath Shinde । सर्वात मोठी बातमी! भाजपच्या नव्या प्रस्तावाने एकनाथ शिंदेंना बसणार फटका

Spread the love