Rishabh Pant । भीषण अपघातावर ऋषभ पंतची प्रतिक्रिया; म्हणाला, “मला वाटले की या जगात माझा वेळ संपला…”

Rishabh Pant

Rishabh Pant । क्रिकेटच्या मैदानात परतण्याच्या तयारीत असलेला स्टार फलंदाज ऋषभ पंत डिसेंबर 2022 मध्ये झालेल्या भीषण अपघाताविषयी बोलला आहे. ऋषभ पंत म्हणतो की, हा अपघात इतका धोकादायक होता की त्याला वाटले की या जगात आपला वेळ संपला आहे. मात्र, ऋषभ पंतने कबूल केले की, अपघातानंतर त्याला क्रिकेटच्या मैदानात परतण्यासाठी खूप मेहनत करावी लागणार आहे. ऋषभ पंतने खूप मेहनत घेतली असून आता तो लवकरच मैदानात परतण्यासाठी सज्ज झाला आहे.

Manoj Jarange Patil । सर्वात मोठी बातमी! मनोज जरांगे आता धनगर, मुस्लीम आरक्षणासाठी लढा देणार?

डॉक्टरांनी पंतला सांगितले की, त्याला मैदानात परतण्यासाठी 16 ते 18 महिने लागू शकतात. ऋषभ पंत म्हणाला, “माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच मला वाटले की माझा या जगातला काळ संपला आहे. अपघाताच्या वेळी मला कळले की समस्या किती मोठी होती. पण मी नशीबवान होतो कारण एवढ्या भीषण अपघातातून देखील मी वाचलो आहे. असं ऋषभ पंत म्हणाला आहे.

Accident News । धक्कादायक! कंटेनर आणि दुचाकीच्या भीषण अपघातात पती-पत्नीचा जागीच मृत्यू

दरम्यान, ऋषभ पंत मार्चमध्ये होणाऱ्या इंडियन प्रीमियर लीगच्या 17 व्या हंगामातून मैदानात परतण्याची तयारी करत आहे. आयपीएलच्या १७व्या हंगामात ऋषभ पंत संघाचे नेतृत्व करताना दिसणार असल्याचे दिल्ली कॅपिटल्सने स्पष्ट केले आहे. मात्र, ऋषभ पंत यष्टिरक्षणाची जबाबदारी पेलणार की नाही, याचे उत्तर अद्याप मिळालेले नाही.

Manoj Jarange । ‘…तर OBC आरक्षणच रद्द होईल’! मनोज जरांगेंच्या इशाऱ्यानंतर ओबीसींमध्ये मोठी खळबळ

Spread the love