CCTV Footage । महिलेने ऑटो राईड रद्द केल्याने रिक्षाचालकाचा राग अनावर, केली महिलेला मारहाण; पहा व्हायरल VIDEO

CCTV Footage

CCTV Footage । सोशल मीडियावर (Social media) अनेक गोष्टी व्हायरल होत असतात. यातील काही व्हिडिओ पाहून आपल्याला हसू आवरत नाही तर काही व्हिडिओ (Social media video) पाहून आपल्या डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहत नाही. सध्या एक असाच व्हिडिओ व्हायरल (Social media viral video) झाला आहे. एका रिक्षाचालकाने महिलेला मारहाण केल्याची घटना घडली आहे. व्हिडिओ पाहून वापरकर्ते यावर संताप व्यक्त करत आहेत. (Latest marathi news)

Fire News । कंपनीला भीषण आग, बॉयलर फुटल्याने घडली मोठी दुर्घटना

मिळालेल्या माहितीनुसार, बेंगळुरूच्या बेलंदूर भागात ही धक्कादायक घटना घडली आहे. एका महिलेने अॅपच्या मदतीने ऑटो बुक केली आणि ऑटो काही वेळातच त्या ठिकाणी पोहोचली. पण महिलेने काही वेळात राईड कॅन्सल केली. यावरून महिला आणि रिक्षाचालकामध्ये शाब्दिक बाचाबाची झाली. पाहता पाहता ऑटोचालकाने खाली उतरून महिलेला मारहाण करायला सुरुवात केली.

सीसीटीव्ही व्हिडीओमध्ये ही घटना कैद झाली आहे. महिलेने स्वत:ला वाचवण्यासाठी खूप प्रयत्न केला. पण ऑटोचालकाने महिलेला जमिनीवर ढकलून देत तिथून पळ काढला. हा गोंधळ सुरु असताना कोणीही महिलेच्या मदतीला पुढे आले नाही. महिलेच्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी संबंधित ऑटोचालकाविरोधात गुन्हा दाखल केला असून त्याचा शोध सुरु आहे.

Manoj Jarange Patil । “…तेव्हा अजित पवारांच्या गळ्यात उडी मारणार”, जरांगे पाटलांचा इशारा

Spread the love