Ratan Tata death । भारतीय उद्योग जगतातील एक महत्त्वाचे व्यक्तिमत्व रतन टाटा यांचे ८६ व्या वर्षी निधन झाले आहे. त्यांच्या निधनाने टाटा समूहाच्या भविष्याबद्दल अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. रतन टाटा यांच्याकडे ३८०० कोटी रुपयांच्या संपत्तीची मालकी होती, पण त्यांनी आयुष्यात लग्न न केले त्यामुळे त्यांच्या संपत्तीचा वारसदार कोण असेल, याबद्दल चर्चा सुरू झाली आहे. रतन टाटा यांच्या सामाजिक उपक्रमांमुळे आणि दानधर्मामुळे त्यांनी भारतीय जनतेमध्ये विशेष स्थान मिळवले होते.
Supriya Sule । बारामतीबाबत सुप्रिया सुळेंचं मोठं वक्तव्य
सध्याच्या चर्चेत नोएल टाटा यांचे नाव प्रमुखता घेत आहे. नोएल टाटा हे रतन टाटांचे सावत्र भाऊ असून, त्यांच्या तीन मुलांचे नाव माया, नेविल, आणि लिया आहे. या तिघांनाही टाटा समूहात महत्त्वपूर्ण भूमिका बजावण्याची क्षमता आहे. माया टाटा, ३४ वर्षांच्या, यांनी टाटा अपॉर्चुनिटीज फंड आणि टाटा डिजीटलमध्ये काम केले आहे, तर नेविल टाटा, ३२ वर्षांचे, यांनी टोयोटा किर्लोस्कर ग्रुपच्या मानसी किर्लोस्कर यांच्यासोबत विवाह केला आहे. लिया टाटा, ३९ वर्षांच्या, हॉस्पिटालिटी सेक्टरमध्ये कार्यरत आहेत आणि ताज हॉटेल्स रिसॉर्ट्समध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिलं आहे.
Manoj Jarange l धक्कादायक! मनोज जरांगेंच्या विरोधात आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या डॉक्टरवर शाईफेक!
रतन टाटा यांच्या निधनानंतर, राज्य सरकारने एक दिवसाचा शासकीय दुखवटा जाहीर केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या संदर्भात घोषणा केली असून, रतन टाटांवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जातील. सध्या त्यांच्या पार्थिवाला अंत्यदर्शनासाठी राहत्या निवासस्थानी ठेवण्यात आले आहे.
Ratan Tata death । सर्वात मोठी बातमी! भारताच्या उद्योग क्षेत्रातला बापमाणूस रतन टाटा यांचे निधन