Pune Crime । पुणे : मागील काही दिवसांपासून पुणे शहरात गुन्हेगारीचे (Crime) प्रमाण झपाट्याने वाढत चालले आहे. पुण्यातील पिंपरी चिंचवडमध्ये ऑटो फर्मच्या काही कर्मचाऱ्यांनी समोस्यामध्ये गुटखा आणि दगड मिळाल्याची तक्रार कर्मचाऱ्यांनी केली. अशातच आता असाच एक किळसवाणा प्रकार पुण्यात घडला आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. (Latest marathi news)
Congress । ब्रेकिंग! काँग्रेसने जाहीर लोकसभेची तिसरी यादी; या नेत्यांना मिळाली संधी
पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील बेल्हे येथे बर्फाची लादी विक्री करताना एका बर्फाच्या लादीत चक्क मेलेला उंदीर सापडला आहे. सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरु असून बर्फाचा वापर खूप वाढला आहे. पण बर्फ बनवताना काही उत्पादक लक्ष देत नसल्याचे समोर आले आहे. सध्या सोशल मीडियावर या प्रकाराचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे.
Ajit Pawar । “मी तोंड उघडल्यास…” अजित पवारांनी दिला कुटुंबातीलच व्यक्तींना गंभीर इशारा
हा व्हिडिओ पाहून अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. जरी खाद्यपदार्थांची शुद्धता तपासण्याची जबाबदारी अन्न व औषध प्रशासन विभागावर असली तरी बर्फ बनवणाऱ्या कंपन्यांकडे या विभागाने पूर्ण दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे. या घटनेमुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. यावर आता कोणती कारवाई होणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.