Lok Sabha Election । लोकसभेपूर्वी महाविकास आघाडीला मोठा धक्का! बड्या नेत्याचा शिंदे गटात प्रवेश

Lok Sabha Election । राज्यात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. (Lok Sabha Election 2024) राज्यात यंदा कोणाचे सरकार येणार हे येत्या काळात स्पष्ट होईल. महाविकास आघाडी आणि महायुतीने आपल्या उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. पण काही जागांवर पेच कायम आहे. पक्षाने तिकीट नाकारल्याने काही नाराज नेते दुसऱ्या पक्षात प्रवेश करत आहेत. (Latest marathi news)

Maharashtra Politics । माढ्यात फडणवीसांची नवी चाल, मोहिते- पवार गटाला दिला मोठा धक्का

अशातच लोकसभेपूर्वी महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे. कारण शेतकरी कामगार पक्षाचे नेते रमेश मोरे (Ramesh More) यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. ते माणगाव तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आहेत. रमेश मोरे यांच्या निर्णयामुळे महायुतीची ताकद आणखी वाढली आहे. पण याचा फटका महाविकास आघाडीला सहन करावा लागेल.

Bus Accident । भीषण बस अपघात! सात जणांचा जागीच मृत्यू

सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे काही दिवसांपूर्वी ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार अनंत गीते यांच्या प्रचारार्थ मोर्बे येथे जाहीर सभा घेतली होती. या सभेचं संपूर्ण नियोजन रमेश मोरे यांनी केले होते. पण आता निवडणुकीच्या तोंडावर रमेश मोरे यांनी महाविकास आघाडीला धक्का देत महायुतीची साथ देण्याचे ठरवले आहे.

Chhagan Bhujbal । अजित पवार गटनेते छगन भुजबळ यांचे शरद पवार-उद्धव ठाकरेंबाबत सर्वात मोठे वक्तव्य

Spread the love