Bus Accident । भीषण बस अपघात! सात जणांचा जागीच मृत्यू

Bus Accident । अपघाताच्या (Accident) घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. दररोज कुठे ना कुठे भीषण अपघात होत असतात. अपघातात अनेकांचा जीव जातो. यामुळे अनेकांचे संसार उध्वस्त होतात. सध्या देखील अशीच अपघाताची एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. ट्रकच्या वेगाने बस कापून सात जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. (Accident News)

Chhagan Bhujbal । अजित पवार गटनेते छगन भुजबळ यांचे शरद पवार-उद्धव ठाकरेंबाबत सर्वात मोठे वक्तव्य

उत्तर प्रदेशमधील उन्नाव येथे भीषण बस अपघात झाला आहे. (Bus Accident News) ट्रक आणि बसच्या समोरासमोर धडक झाली. या अपघातात बस एका बाजूने कापून निघाली. या घटनेत सात जणांचा मृत्यू तर २५ पेक्षा जास्त लोक जखमी झाले आहेत. जखमींमध्ये अनेकांची गंभीर आहे. सफीपूर कोतवाली पोलिस ठाण्याच्या हद्दीतील जमल्दीपूर गावाजवळ पोहोचली असता बसला अपघात झाला आहे.

Baramati News । बारामतीत गावागावात धमकीसत्र, बड्या नेत्याचा अजित पवारांवर गंभीर आरोप

अपघातांनंतर तातडीने पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. हा अपघात इतका भयानक होता की जखमी आणि मृत लोक बसच्या फाटलेल्या साईडने लटकत होते. या भीषण घटनेनंतर ट्रक चालक पळून गेला. त्यामुळे पोलिसांनी जिल्ह्यामध्ये नाकाबंदी केली आहे. जखमींवर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या अपघातामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

Ajit Pawar । ब्रेकिंग न्यूज! भरसभेत अजितदादांनी धरले कान; नेमकं काय घडलं?

Spread the love