Rain Update । सावधान, महाराष्ट्रावर मोठे संकट! या’ ठिकाणी वादळी वाऱ्यासह गारपीट होण्याची शक्यता!

Rain Update

Rain Update । राज्यात अवकाळी पावसाचा प्रकोप वाढत असून शेतकऱ्यांसाठी आणखी एक धोक्याची घंटा वाजली आहे. हवामान विभागाने आगामी तीन दिवसांत राज्यात वादळी वाऱ्यासह गारपीट होण्याची शक्यता व्यक्त केली आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे, कारण मागील काही दिवसांत अवकाळी पावसाने शेतमालाचे मोठे नुकसान केले आहे.

Ajit Pawar । राजकारणात खळबळ! अजितदादांच्या राष्ट्रवादीत भूकंप?

हवामान विभागाच्या ताज्या माहितीनुसार, बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाला आहे. यामुळे अरबी समुद्रातील आर्द्रतेत वाढ झाली आहे, ज्याचा परिणाम राज्यातील मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात दिसून येणार आहे. 26 डिसेंबर आणि 28 डिसेंबर दरम्यान या भागात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे, तसेच 27 डिसेंबरला वादळी वाऱ्यासह गारपीट होण्याची दाट शक्यता व्यक्त केली आहे.

Ladki Bahin Yojna । लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थींना एकनाथ शिंदे यांची महत्त्वाची माहिती, ‘या’ दिवशी डिसेंबर हप्ता लवकरच जमा होणार

गेल्या काही दिवसांत राज्यातील किमान तापमानात वाढ झाल्याने थंडी कमी झाली आहे आणि पुढील काही दिवसांत किमान तापमान 2-4 अंश सेल्सियसने वाढण्याचा अंदाज वर्तवला आहे.

यावर्षीच्या शेवटच्या दिवसांत वादळी पावसाचा फटका राज्याच्या विविध भागांना बसणार आहे. हवामान विभागाने 26 डिसेंबरसाठी धुळे, जळगाव, नाशिक, नंदुरबार, छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे. 27 डिसेंबरला नाशिक, पुणे, जळगाव, अहमदनगर, धुळे, नंदुरबार, जालना, परभणी, बीड, छत्रपती संभाजीनगर, अकोला, अमरावती, वाशिम, बुलढाणा या जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे.

शेतकऱ्यांना या संभाव्य पावसामुळे अतिरिक्त नुकसान होण्याची चिंता आहे.

Spread the love