Pune Accident । पुण्यात मद्यधुंद कार चालकाचा विचित्र अपघात, ९ वाहनांना धडक; एक गंभीर जखमी

Pune Accident

Pune Accident । पुण्यात दिवसेंदिवस जास्त अपघात होत आहेत. आता पुन्हा एकदा पुण्यात एक विचित्र अपघात झाला आहे. सोमवारी रात्री वाघोली परिसरात एक डंपर फुटपाथवर झोपलेल्या ९ जणांना चिरडून गेला होता, तर दुसऱ्या दिवशी पुण्यात चतुश्रृंगी पोलिस ठाण्याच्या हद्दीत मद्यधुंद कार चालकाने ९ वाहनांना धडक दिली.

Ajit Pawar । राजकारणात खळबळ! अजितदादांच्या राष्ट्रवादीत भूकंप?

या अपघातात एक तरुण गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अन्य वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, सुदैवाने जिवीतहानी झाली नाही. अपघात झाल्यानंतर पोलिसांनी त्वरित घटनास्थळी धाव घेतली आणि आरोपी चालक दयानंद केदारीला अटक केली.

Ladki Bahin Yojna । लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थींना एकनाथ शिंदे यांची महत्त्वाची माहिती, ‘या’ दिवशी डिसेंबर हप्ता लवकरच जमा होणार

दयानंद केदारी याने मद्यधुंद अवस्थेत शहराच्या मध्यवर्ती भागातून कार चालवली आणि अनेक वाहनांना धडक दिली. अपघात झाल्यानंतर त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आणि त्याच्यावर ड्रिंक अँड ड्राईव्हसह इतर गंभीर कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

Chhagan Bhujbal । राष्ट्रवादीत मोठा राजकीय भूकंप? छगन भुजबळ घेत आहेत मोठा निर्णय

Spread the love