Ashok Chavan । अशोक चव्हाणांबाबत बोलताना भाजप खासदाराची जीभ घसरली; केले धक्कादायक विधान

Ashok Chavan

Ashok Chavan । काँग्रेसला रामराम ठोकत अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांच्या भाजप प्रवेशामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या. त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केलेला पंधरा दिवस झाले. मात्र अद्यापही भाजपच्या निष्ठावान कार्यकर्त्यांना अशोक चव्हाण यांच्या पक्षप्रवेशाचे गणित सुटेना झाले आहे. नुकतीच एक बैठक पार पडली. या बैठकीमध्ये भाजपच्या नवनिर्वांचित खासदारांनी अशोक चव्हाण यांच्या उपस्थितत धक्कादायक विधान केले आहे.

Rohit Pawar । आत्ताच्या घडीची मोठी बातमी! रोहित पवारांवर गुन्हा दाखल करण्यासंदर्भात कार्यवाही सुरु

खासदार अजित गोपछडे म्हणाले, “अशोक चव्हाण साहेब तुम्ही आता आमच्या भाजप पक्षामध्ये आला आहात. त्यामुळे हळूहळू तुम्हाला सर्व सिस्टिम समजायला उशीर लागणार आहे. मात्र मला असे वाटते की तुम्ही आतमध्ये जावून अजगरा एवढे मोठे होता की काय? असं वक्तव्य खासदार अजित गोपछडे यांनी केले आहे.

Up News । मॅडम, उलटी होईल… सरकारी शाळेतील शिक्षिकेने मुलीला लावले हे घाणेरडे काम करायला; घटना वाचून बसेल धक्का

त्याचबरोबर पुढे बोलताना ते म्हणाले, “भारतीय जनता पार्टी ही भल्याभल्यांना समजत नाही. मला देखील माहिती नव्हती. खासदारकीसाठी माझं नाव येईल मात्र अचानक माझे नाव आले. त्यामुळे भारतीय जनता पार्टी समजून घेण्यासाठी तिचे चिंतन आणि विचार करणे गरजेचे आहे. असं अजित गोपछडे म्हणाले आहेत . सध्या त्यांच्या वक्तव्याच्या सगळीकडे जोरदार चर्चा सुरू आहेत.

Nilesh Rane । निलेश राणे यांना मोठा धक्का! पुण्यातील डेक्कन परिसरातील मालमत्ता सील

Spread the love