Darshana Pawar । दर्शना पवारचा खून करून राहुल फरारच झाला नाही; तर त्याने…, धक्कादायक माहिती आली समोर

Darshna pawar

Darshana Pawar । राजगडाच्या पायथ्याशी MPSC च्या परीक्षेत राज्यात तिसऱ्या आलेल्या दर्शना पवार (Darshana Pawar) हिचा मृतदेह संशयास्पद स्थितीत 18 जून रोजी आढळून आला होता. त्यावरून पोलिसांनी आपली सूत्रे कामाला लावून दर्शनाच्या मारेकऱ्यांना (Rahul Handore) शोधण्यात यश आले. परंतु याप्रकरणी अधिक तपास सुरु असताना दररोज नवनवीन माहिती समोर येत आहे. त्यामुळे पोलिसही चक्रावले आहेत. (Latest Marathi News)

धक्कादायक! एकाच रात्रीत 19 जणांना सापाने घेतला चावा; परिसरात भीतीचे वातावरण

दर्शनाची हत्या तिचाच मित्र राहुल हंडोरे याने केली असून त्याला पोलिसांनी मुंबईतून (Mumbai) अटक केली आहे. त्याची कसून चौकशी केली असता त्याने खून कसा केला? त्यानंतर कोणाला याबाबत समजू नये म्हणून कसा लपून बसला होता? याची माहिती दिली आहे. हा सर्व घटनाक्रम पोलिसांनी सांगितला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तो खून करून रेल्वेने सांगलीला गेला. तेथे न थांबता तो गोव्याला निघून गेला. गोव्यावरून त्याने चंदीगड आणि तेथून पश्चिम बंगाल येथील हावडा गाठले.

Ajit Pawar । अजित पवारांनी विरोधी पक्षनेते पदावर राहावे की नाही? एकनाथ शिंदेनी दिले हे उत्तर,’ म्हणाले..

परत त्याने तेथून मुंबई गाठली. परंतु पोलिसांची दिशाभूल व्हावी यासाठी त्याने मोबाइल बंद ठेवला होता. स्थानिक फोनवरून तो आपल्या मित्रांना आणि कुटुंबाला संपर्क साधत होता. संपर्क साधल्यानंतर तो लगेचच आपले ठिकाण बदलत होता. मात्र पोलिसांना याची माहिती फोन मागणाऱ्या प्रवाशांनी दिली आणि पोलिसांना त्याला चार दिवसात अटक करण्यात यश आले.

आता छत्री घेऊनच घराबाहेर पडा, पावसाबाबत हवामान विभागाने दिली मोठी अपडेट; राज्यात कसं असेल हवामान?

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *