Radhakrishna Vikhe Patil । सध्या एक मोठी बातमी समोर आली आहे. राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या गटाला शिर्डीत साईबाबा संस्थान कर्मचारी सोसायटीच्या निवडणुकीत मोठा झटका बसला आहे. या निवडणुकीत कामगार नेते विठ्ठल पवार यांच्या परिवर्तन पॅनलने 17 पैकी 17 जागा जिंकल्या आहेत. विखे पाटील गटाचा अक्षरश: दारुण पराभव झाला आहे. त्यामुळे त्यांना मोठा धक्का बसला असल्याचे बोलले जात आहे.
कामगार नेते विठ्ठल पवार यांच्या परिवर्तन पॅनलचा या निवडणुकीत दणदणीत विजय झाला आहे. साईबाबा संस्थानात परिवर्तन पॅनलचं निर्विवाद वर्चस्व पाहायला मिळालं आहे. या संस्थेमध्ये मागच्या 20 वर्षांपासून विखे पाटील यांच्या समर्थकांची सत्ता होती. मात्र यावेळी सत्ता हाहातून निसटली आहे.
काल प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या शिर्डीतील साईबाबा संस्थान कर्मचारी सोसायटी निवडणुकीची मतदान प्रक्रिया पार पडली. त्यानंतर मतमोजणीदेखील पार पडली. मात्र यामध्ये विखेंना मोठा धक्का बसला असून त्यांच्या हाहातून सत्ता गेली आहे. विखेंच्या समर्थक पॅनलला एकाही जागेवर विजय मिळवता आलेला नाही. त्यामुळे विखे पाटील गटासाठी हा मोठा झटका मानला जातोय.