Mahesh Gaikwad Health Update । भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेना शिंदे गटाचे शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यावर पोलिसांसमोरच सहा गोळ्या झाडल्या. राजकारण आणि जागेच्या वादावरून हा गोळीबार झाला असल्याचे बोलले जात आहे. महेश गायकवाड यांच्यासोबत राहुल पाटील हे देखील गोळीबारात जखमी झाले होते. त्यांच्या शरीरातूनही डॉक्टरांनी दोन गोळ्या बाहेर काढल्या आहेत. (Ganpat Gaikwad Firing)
Radhakrishna Vikhe Patil । राधाकृष्ण विखे पाटील यांना सर्वात मोठा धक्का
जखमींवर ठाण्याच्या ज्युपिटर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. या प्रकरणी भाजप आमदारासह तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याचबरोबर त्यांना अटकही करण्यात आली आहे. डॉक्टरांनी महेश गायकवाड यांच्या शरीरातून सहा गोळ्या बाहेर काढल्या. दरम्यान आता त्यांच्या प्रकृतीबाबत मोठी बातमी समोर आली आहे.
गोळीबाराच्या घटनेत गंभीर जखमी झालेल्या महेश गायकवाड यांच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. महेश गायकवाड सध्या धोक्यातून बाहेर आहेत. त्यांना जनरल वार्डमध्ये शिफ्ट केल्याची माहिती समोर आली आहे. महेश गायकवाड यांच्यावर ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरु होते.