Pune Metro । पुणे : १ ऑगस्ट रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) हे लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार स्वीकारण्यासाठी पुण्यात आले होते. यावेळी अनेक कार्यक्रमांचे नियोजनही केले होते, या दौऱ्यामध्ये फुगेवाडी ते शिवाजीनगर आणि गरवारे कॉलेज ते रुबी हॉल क्लिनिक या मेट्रोमार्गाचे (Metro) उद्घाटन मोदी यांच्या हस्ते केले होते. याचा फायदा पुणेकरांना झाला आहे. (Pune Metro News)
Rozgar Mela । नरेंद्र मोदींच्या हस्ते 51 हजार तरुणांना मिळणार सरकारी नोकऱ्यांची नियुक्ती पत्र
अशातच आता पुणेकरांनी एक विक्रम आपल्या नावावर केला आहे. मेट्रोमधून प्रवास करण्यासाठी शनिवार आणि रविवारी काहीशी सवलत असते. काल आणि परवा मोठ्या प्रमाणात पुणेकरांनी मेट्रोतून प्रवास केला आहे. रविवारी एकाच दिवसात एकूण 80 हजार 868 पुणेकरांनी प्रवास केला. त्यामुळे शिवाजीनगर स्थानक, वनाज मेट्रो स्थानक, रुबी हॉल मेट्रो स्थानकावर चांगली गर्दी झाल्याचे पाहायला मिळाले होते. (Latest Marathi News)
दरम्यान, नरेंद्र मोदी यांनी डिसेंबर २०१८ मध्ये पुणे मेट्रोची पायाभरणी केली होती. सर्व शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना तिकिटामध्ये ३० टक्के सवलत देण्यात आले असून १० ते ३० रुपयांपर्यंत तिकीट उपलब्ध करून देण्यात आले आहे. दर दहा मिनिटांना मेट्रो असते. तसेच कमी गर्दी असताना पंधरा मिनिटांच्या अंतराने मेट्रो असते.
Crime News । भयानक! रमी सर्कल गेममुळे डोक्यावर कर्जाचा डोंगर, घेतला टोकाचा निर्णय अन्….