Political News । महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप? काँग्रेस आमदार, खासदार अस्वस्थ; भाजपच्या बड्या खासदाराच्या दाव्याने खळबळ

Political earthquake again in Maharashtra? Congress MLAs, MPs upset; Excitement due to the claim of a senior BJP MP

Political News । सोलापूर : मागील वर्षी शिवसेनेत (Shivsena) फूट पडल्यांनंतर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी भाजपची (BJP) साथ देत सत्ता स्थापन केली. यावर्षी अजित पवार (Ajit Pawar) यांनी महायुतीची साथ देत उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. अगोदर शिवसेना आणि आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटीमुळे महाविकास आघाडीला खूप मोठा धक्का बसला आहे. आगामी निवडणुकीवर याचा परिणाम होऊ शकतो. (Latest Marathi News)

Crime News । भयानक! रमी सर्कल गेममुळे डोक्यावर कर्जाचा डोंगर, घेतला टोकाचा निर्णय अन्….

महाविकास आघाडीतील आता काँग्रेस (Congres) पक्षात फूट पडली नाही. परंतु हा पक्ष देखील लवकरच फुटू शकतो. पक्षाच्या आमदार आणि खासदारांमध्ये खूप अस्वस्थता आहे. ते भाजपच्या वाटेवर आहेत. त्यांनी आपली अस्वस्थता मला खासगीत बोलून दाखवली असून लवकरच काँग्रेस पक्ष फुटेल, असा दावा खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर (Ranjit Singh Naik Nimbalkar) यांनी केला आहे.

Tripti Desai । बारामतीत सुप्रिया सुळेंना काटें की टक्कर! तृप्ती देसाई लढणार निवडणूक, म्हणाल्या, “भाजपाने…”

तसेच त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावरही भाष्य केले आहे. पवार कुटुंबाची एकजूट महत्त्वाची आहे. पक्षातील वाद मिटवून शरद पवारांनी भाजपची साथ दिली तर त्याचा फायदाच होईल. त्यांच्या पाठिंब्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे (Narendra Modi) हात बळकट होतील. आम्हालाही त्याचा आनंद होईल, असे रणजितसिंह नाईक निंबाळकर म्हणाले आहेत.

Uddhav Thackeray । उद्धव ठाकरेंचा भाजपवर निशाणा! म्हणाले; “भाजपमध्ये सगळे आयाराम…

Spread the love