Pune Solapur Highway Accident । सध्या अपघाताची एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर कारचे टायर फुटल्याने भीषण अपघात झाला आहे. इंदापूर तालुक्यातील डाळज या ठिकाणी हा अपघात झाला आहे. हा अपघात एवढा भीषण होता की, या अपघातामध्ये चार जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. अपघाताची माहिती मिळताच तेथील स्थानिक लोकांनी घटनास्थळी धाव घेतली आणि जखमी प्रवाशांना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले.
पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर ब्रिजा गाडीचा टायर फुटून अपघात झाला आहे, या अपघातात गाडीच्या पुढच्या बाजूचा पूर्ण चक्काचूर झाला आहे तर अपघातामध्ये चार जण जागी ठार झाले असून एक जण गंभीर जखमी तर एक किरकोळ जखमी झाला आहे.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पुणे जिल्ह्याच्या इंदापूर तालुक्यातील नंबर २ या ठिकाणी हा अपघात झाला आहे.
Lonavala News । लोणावळा दुर्घटनेनंतर प्रशासनाची मोठी कारवाई, अवैध अतिक्रमणाला बसणार आळा
अपघातग्रस्त गाडी ही पुण्याकडून सोलापूरच्या दिशेने निघाली होती. त्याचवेळी डाळज हद्दीत आल्यानंतर हा अपघात झाला आहे. गाडीच्या पुढील डाव्या बाजूचा टायर फुटल्याने गाडी जवळपास 50 मीटर जमिनीला घासत येऊन कोसळली. गाडीने रस्त्यावर चार ते पाच पलट्या खाल्ल्या आणि ड्रेनेज लाईनच्या सिमेंट खांबाला देखील जोरदार धडक दिली त्यानंतर गाडी नाल्यात जाऊन पडली आणि हा भीषण अपघात झाला.