Lonavala News । लोणावळा दुर्घटनेनंतर प्रशासनाची मोठी कारवाई, अवैध अतिक्रमणाला बसणार आळा

Lonavala News

Lonavala News । लोणावळ्यात पाच जण पाण्यात वाहून गेल्याच्या घटनेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कडक कारवाईचे आदेश दिले असून, त्यामुळे प्रशासन कारवाईत आले आहे. मुख्यमंत्र्यांच्या (Eknath Shinde News) सूचनेनंतर २४ तासांत प्रशासनाने पर्यटनस्थळावरील अतिक्रमण हटविण्याचे काम सुरू केले आहे. भुशी धरण (Bhushi Dam) परिसरात पर्यटनाला बाधा आणणारे छोटे हॉटेल, फेरीवाले, चना-चाट विक्रेते यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे.

Maharashtra Politics । मोठी बातमी! अजित पवारांना बालेकिल्ल्यात मोठा धक्का! बडा नेता शरद पवार गटात प्रवेश करणार?

त्यामुळे कारवाई करण्यात येत आहे

भविष्यात अन्सारी आणि सय्यद कुटुंबासारखे असे अपघात होऊ नयेत, यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. लोणावळा नगरपरिषद आणि पुणे रेल्वे बोर्ड प्रशासन यांच्यातर्फे ही संयुक्त मोहीम राबविण्यात येत आहे. वृत्तानुसार, लोणावळ्यातील लोकप्रिय पर्यटन स्थळ असलेल्या भुशी धरण परिसरात अतिक्रमण हटवण्याची कारवाई सुरू झाली आहे. चहा, नाष्टा, भाजी विक्रेते, फेरीवाले, मका विक्रेत्यांनी येथे अतिक्रमण करून दुकाने थाटली होती, त्यामुळे रेल्वे प्रशासनाने कडक कारवाई केली आहे.

Uddhav Thackeray । उद्धव ठाकरेंचे सर्वात मोठं वक्तव्य

पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर मुंबईसह महाराष्ट्राच्या विविध भागांतून पर्यटकांची गर्दी उसळली होती. अतिक्रमणामुळे येथे मोठी गर्दी होत आहे. दोन दिवसांपूर्वी झालेल्या अपघातानंतर प्रशासनाने गांभीर्याने घेत कारवाई सुरू केली आहे. या कारवाईदरम्यान रेल्वे पोलिस दल आणि लोणावळा पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता.

Bhushi Dam । पाच जण वाहून गेल्यावर भुशी डॅम परिसरात मोठी ऍक्शन

Spread the love