Pune News | पुण्यात वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश! अभिनेत्रीसह तीन महिला पोलिसांच्या ताब्यात

Pune News

Pune News | पुण्यात दिवसेंदिवस अनेक विचित्र प्रकार समोर येत आहेत. मागच्या काही दिवसापासून पुण्यात स्पा सेंटरच्या नावाखाली अनेक ठिकाणी वेश्या व्यवसाय सुरू आहे. गेल्या सहा महिन्यात पोलिसांनी धाड टाकत अनेक स्पा सेंटर मधील या व्यवसायाचा पर्दाफाश केला आहे. सध्या देखील पुण्यात वेश्याव्यवसायाचे आंतरराष्ट्रीय रॅकेट उघड झाले आहे. या प्रकरणात एका अभिनेत्रीसह तिघांना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

Sharad Pawar | सोलापूरमध्ये शरद पवारांना मोठा धक्का! बड्या नेत्यांचा अजित पवार गटात प्रवेश

पोलिसांनी पुण्यामध्ये हाय प्रोफाईल वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश केला आहे. वेश्याव्यवसाय करणाऱ्या राजस्थानी अभिनेत्रीला पुणे पोलिसांनी अटक केल्याची माहिती समोर आली आहे. एवढेच नाही तर राजस्थानी अभिनेत्री सह दोन मॉडेलला देखील पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पुण्यातील विमान नगर परिसरातील पुणे पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा विभागाने ही कारवाई केल्याची माहिती मिळत आहे.

Pune Accident News | पुण्यात भीषण अपघात! कारचालकाने 4 ते 5 दुचाकींना चिरडल…

राजस्थानी अभिनेत्री सोबत उझबेकिस्तान मधून आलेल्या दोन मॉडेल ऑनलाईन वेश्या व्यवसाय करत होत्या. याबाबत पुणे पोलिसांना माहिती समजली त्यानंतर पोलिसांनी सापळा रचला आणि यांना अटक करण्यात आले आहे. या तीनही महिला मागच्या अनेक दिवसापासून पुण्यातील विमान नगर भागात वेश्याव्यवसाय करत होत्या.

Pune Accident News | पुण्यात भीषण अपघात! कारचालकाने 4 ते 5 दुचाकींना चिरडल…

Spread the love