
Pune News । विद्येचे माहेरघर म्हणून पुण्याला ओळखले जाते मात्र पुण्यात दिवसेंदिवस गुन्हेगारी वाढतच चालली आहे. नुकतंच पुणे पोलिसांनी एकीकडे देशातील सर्वात (Pune Drugs) मोठ्या ड्रग्स रॅकेटचा खुलासा केला आहे तर दुसरीकडे महाविद्यालयीत विद्यार्थी या ड्रग्सच्या नशेत तुल्ल असल्याचे दिसत आहे. सध्या अभिनेते रमेश परदेशी परदेसी पुण्यातील तरुणींनी ड्रग्स घेतलेला भयंकर व्हिडीओ समोर आणला आहे. पुण्यातील वेताळ टेकडीवरचा हा व्हिडीओ आहे. यामुळे सगळीकडे मोठी खळबळ उडाली आहे.
सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. या व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, दोन महाविद्यालयीन तरुणी नशेत असल्याचं दिसत आहे. त्यामुळे शिक्षणासाठी पुण्यात आलेली तरुणाई नेमकी कोणत्या दिशेने वाटचाल करत आहे, असा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.
Eknath Shinde । एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! गटातील आमदारावर गुन्हा दाखल
व्हिडिओमध्ये दोन मुली दिसत आहेत. यामधील एक मुलगी बेशुद्ध अवस्थेत आहे तर दुसरी मुलगी ड्रग्स प्राषण केल्याने नशेत बडबडताना दिसत आहे. रमेश परदेसी यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडीओ शेअर करत ते म्हणतात की, ” आम्ही वेताळ टेकडीवर पळायला आलो होतो. मात्र त्या ठिकाणी महाविद्यालयीन दोन तरुणी बियर, दारु आणि नशेचं काहीतरी घेऊन टेकडीच्या कोपऱ्यात पडल्या होत्या. या तरुणींना आम्ही इथं सेफ जागी घेऊन आलो. हे यासाठी सांगतोय कारण पुण्यात दोन दिवसांपूर्वी 4 हजार कोटींचं ड्रग्ज सापडलं आहे. असं ते म्हणत आहेत.