Pune Crime । धक्कादायक! नववीत शिकणाऱ्या मुलाचा कोयत्याने केला खून

Pune Crime

Pune Crime । पुणे शहरामध्ये दिवसेंदिवस गुन्हेगारी वाढतच चालली आहे. कोयता गॅंग देखील पुणे शहरात धुमाकूळ घालत आहे. अल्पवयीन मुले देखील कोयते घेऊन लोकांमध्ये दहशत निर्माण करण्याचे प्रयत्न करत असल्याचे दिसत आहे. सध्या देखील एक धक्कादायक घटना समोर आली आहे. दोन अल्पवयीन मुलांनी एका नववीत शिकणाऱ्या मुलाचा कोयत्याने खून केल्याची घटना घडली आहे. यामुळे सगळीकडे मोठी खळबळ उडाली आहे. या खुनाचे कारण देखील धक्कादायक आहे.

Lok Sabha Elections 2024 । लोकसभा निवडणुकीपूर्वी नरेंद्र मोदींना सर्वात मोठा धक्का!

याबाबत अधिकची माहिती अशी की, या दोघांची या एकच मैत्रीण होती. मात्र ती मैत्रीण बोलत नाही, म्हणून त्याचा खून करण्यात आला. या प्रकरणात दोन अल्पवयीन आरोपींना पुणे पोलिसांनी अटक केली आहे. त्याचबरोबर अल्पवयीन मुलांकडे देखील सहज कोयता मिळत असल्याबद्दल पुणेकरांमध्ये चिंता व्यक्त होऊ लागली आहे.

Rohit Pawar । “बंदूक मात्र अजितदादांच्या खांद्यावरून…”, रोहित पवार यांचे सर्वात मोठे वक्तव्य

मिळालेल्या माहितीनुसार, प्रकाश असे मृत्यू झालेल्या अल्पवयीन मुलाचे नाव आहे. प्रकाश आणि त्याचे हल्लेखोर मित्र नववीमध्ये शिकत असून त्यांची एक मैत्रीण होती. हल्ला करणाऱ्यांपैकी एका मुलाशी ती मुलगी काही दिवसांपासून बोलत नव्हती. प्रकाश याच्या सांगण्यावरुन ती मुलगी बोलत नाही, असा त्यांचा समज झाला. यामुळे यांनी प्रकाशला जीवे मारली. अशी माहिती पोलीस तपासात उघड झाली आहे.

Breaking । एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांना जन्मठेप; मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा दणका

Spread the love