Lok Sabha Election । भाजपचे टेन्शन वाढले! ‘हा’ नेता लढणार अपक्ष

Bjp

Lok Sabha Election । निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्यापासून राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. महायुतीमध्ये सध्या जागा वाटपावर चर्चा सुरू आहे. पण निवडणूक होण्यापूर्वी भाजपची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे. कारण काही नेत्यांना तिकीट न दिल्याने नेते अपक्ष लढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Pune Crime । धक्कादायक! नववीत शिकणाऱ्या मुलाचा कोयत्याने केला खून

ada

भाजपने माढा मतदारसंघातून रणजितसिंह निंबाळकर यांना संधी दिली आहे, पण या मतदारसंघातून धैर्यशील मोहिते पाटील यांना उमेदवारी हवी होती. त्यांना उमेदवारी डावल्याने त्यांनी माढ्यातून प्रचाराला सुरुवात केली आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे मोहिते पाटील कोणत्या पक्षाची निवडणूक लढवणार हे जरी ठरले नसले तरी त्यांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. त्यामुळे चर्चांना उधाण आले आहे.दरम्यान मोहिते पाटील गट नाराज झाल्याने भाजप नेते गिरीश महाजन यांनी त्यांची समजूत काढली होती. पण त्यांना कार्यकर्त्यांच्या रोषाला सामोरे जावे लागले.

Lok Sabha Elections 2024 । लोकसभा निवडणुकीपूर्वी नरेंद्र मोदींना सर्वात मोठा धक्का!

अजित पवार गटातील नेते रामराजे नाईक निंबाळकर यांनी देखील रणजीत निंबाळकर यांना उमेदवारी न देण्याबाबत भाजपला सांगितले होते. रणजीत निंबाळकर यांचे तिकीट कापून आता धैर्यशील मोहिते पाटील यांना तिकीट द्या, अशी मागणी कार्यकर्त्यांमधून केली जात आहे. त्यामुळे आता मोहिते पाटील बंडखोरी करणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

Rohit Pawar । “बंदूक मात्र अजितदादांच्या खांद्यावरून…”, रोहित पवार यांचे सर्वात मोठे वक्तव्य

Spread the love