
Pune Crime News l पुण्याच्या मध्यवर्ती भागातील सदाशिव पेठेत रविवारी रात्री एक धक्कादायक हल्ला झाला. किरकोळ वादावरून १० ते १५ जणांच्या टोळक्याने एका २६ वर्षीय युवकावर कोयत्याने हल्ला केला, ज्यामध्ये युवक गंभीर जखमी झाला आहे. जखमी युवकाचे नाव अक्षय वाघ असून, सध्या त्याच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
Anjali Damania । सतीश भोसलेचा आणखी एक पैसे उधळतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
रविवारी रात्री ९ वाजता अक्षय वाघ आपल्या मित्रासोबत क्रिकेट सामना पाहण्यासाठी चिमण्या गणपती चौकात गेला होता. सामना संपल्यानंतर रात्री साडेदहा वाजता अक्षय घरी जात असताना त्याचा दोन व्यक्तींशी किरकोळ वाद झाला. वाद वाढू नये म्हणून त्याचा मित्र हस्तक्षेप करत होता, परंतु त्यानंतर त्या दोघांनी आपल्या इतर साथीदारांसह अक्षयवर हल्ला केला.
हल्ल्यात अक्षयला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली आणि त्याच्या डोक्यावर, पाठीवर कोयत्याने वार करण्यात आले. याशिवाय मदतीसाठी आलेल्या मित्रावरही हल्ला झाला. हल्लेखोरांनी परिसरात दहशत निर्माण करत तिथून पसार झाले. सद्याच्या परिस्थितीत, अक्षय वाघ गंभीर जखमी असून, त्याची स्थिती चिंताजनक आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
Chhaava । ‘छावा’ चित्रपटाच्या कमाईबाबत सर्वात मोठी अपडेट समोर!