Pune Crime । गँगस्टर शरद मोहोळ (Sharad Mohol) याची हत्या झाल्यानंतर पुणे शहर चांगलेच हादरले. पुण्यामध्ये सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या प्रकरणांमध्ये अनेक मोठमोठे खुलासे देखील होत होते. या प्रकरणातील मुख्य आरोपी गणेश मारणे याला पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी आरोपींना अटक केली असली तरी शरद मोहळ याच्या पत्नी स्वाती मोहळ यांना धमकी देण्यात आली होती. याप्रकरणी पोलिसांनी धमकी देणाऱ्याला ताब्यात घेतले होते.
मार्शल लीलाकर असे धमकी दिलेल्या व्यक्तीचे नाव आहे. शरद मोहोळ याच्या पत्नीला धमकावल्याप्रकरणी हा आरोपी पोलिसांच्या ताब्यात होता. दरम्यान ससून रुग्णालयात असताना त्याने धूम ठोकली आहे. आता याच्या पलायनामागे कोण आहे? याचा तपास केला जात आहे. माहितीनुसार, मार्शल लीलाकर याने सोशल माध्यमावरून रील्स आणि कमेंट करून शरद मोहोळ याची पत्नी स्वाती मोहोळला धमकवले होते. याप्रकरणी पोलिसांनी लीलाकारला अटक केलं होतं.
दरम्यान, मागच्या काही दिवसापूर्वी पुण्याच्या ससून रुग्णालयातील कैद्यांसाठीच्या वॅार्ड क्रमांक 16 मधून अमली पदार्थ तस्कर ललित पाटील पळून गेला होता. त्यांनतर आता पुन्हा एकदा मार्शल लीलाकर हा आरोपी पळून गेला आहे. त्यामुळे आता राज्य सरकारच्या मंत्र्यांवरही मोठ्या प्रमाणात टीका केली जात आहे.