Prithvi Shaw । पृथ्वी शॉच्या अडचणी संपता संपेना! पहा व्हायरल व्हीडिओ

Prithvi Shaw's problems never end! Watch the viral video

Prithvi Shaw । भारतीय संघाचा लोकप्रिय खेळाडू पृथ्वी शॉला (Prithvi Shaw) आयपीएलमध्ये (IPL 2023) फारशी कामगिरी करता आली नाही. खराब कामगिरीमुळे तो सध्या संघाबाहेर आहे. संघात पुन्हा स्थान पटकावण्यासाठी त्याचे प्रयत्न सुरु आहे. परंतु तिथेही त्याला यश मिळत नाही. सध्या तो संघात कमबॅक करण्यासाठी इंग्लंडमध्ये काउंटी क्रिकेट (County Cricket) खेळत आहे. (Latest Marathi News)

WI vs IND 1st T20I । अर्रर्र.. पराभवानंतर भारतीय संघाला आणखी एक मोठा धक्का

काल ग्लुसेस्टरशायर विरुद्ध नॉर्थहॅम्प्टनशायर (Gloucestershire vs Northamptonshire) असा सामना रंगला होता. पृथ्वी शॉ हा नॉर्थहॅम्प्टनशायर काउंट क्लबचे प्रतिनिधित्व करत आहे. ग्लुसेस्टरशायरने नॉर्थहॅम्प्टनशायरला विजयासाठी 279 धावांचे टार्गेट दिले होते. पृथ्वी शॉ सलामीला आला. त्याने आपली कामगिरी दाखवण्याचा प्रयत्न केला. परंतु तो फार काळ मैदानात टिकला नाही. त्याचा हा व्हीडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. (Prithvi Shaw Video)

त्याला 35 बॉलमध्ये 1 सिक्स आणि 2 फोरसह 34 धावा करता आल्या. दरम्यान पृथ्वी शॉ हा मैदानापेक्षा मैदानाबाहेर वादांमुळे जास्त चर्चेत आहे. सध्या तो भारतीय संघात कमबॅक करण्याचा प्रयत्न करत आहे. तिथेही त्याला अपयश येत आहे. जर त्याला या सामन्यात चांगली कामगिरी करता आली नाही तर त्याला संघात (Indian teams) लवकर स्थान मिळणार नाही.

Royal Enfield । बुलेट प्रेमींसाठी आनंदाची बातमी! आता रस्त्यांवर धावणार रॉयल एनफिल्डची इलेक्ट्रिक ‘बुलेट’

Spread the love