![Maharashtra politics](https://www.elokhit.com/wp-content/uploads/2024/03/Maharashtra-politics-10-1024x576.jpg)
Maharashtra politics । जसजशा निवडणुका (Loksabha election) जवळ येऊ लागल्या आहेत तसतसे राज्याच्या राजकारणात अनेक ट्विस्ट येऊ लागले आहेत. लोकसभा निवडणुकीमुळे राज्याचे राजकारण खुप तापले आहे. दोन बड्या पक्षात फूट पडल्याने यंदाची निवडणूक खूप अटीतटीची असणार आहे. अशातच आता पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणात सर्वात मोठा ट्विस्ट आला आहे. (Latest marathi news)
![Topers Ad](https://www.elokhit.com/wp-content/uploads/2024/03/WhatsApp-Image-2024-03-24-at-5.12.41-PM-1024x724.jpeg)
Madhya Pradesh । सर्वात मोठी बातमी! उज्जैनच्या महाकाल मंदिरात भीषण आग, पुजाऱ्यासह 13 जण होरपळले
रासपचे प्रमुख महादेव जानकर (Mahadev Jankar) यांचा महायुतीत समावेश केल्यानंतर शिवसंग्रामचे दिवंगत प्रमुख विनायक मेटे (Vinayak Mete) यांच्या पत्नी ज्योती मेटे (Jyoti Mete) यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची भेट घेतली. दरम्यान, ज्योती मेटे या बीडमधून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. त्यासाठी त्यांनी अगोदर खासदार शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट घेतली होती. त्यामुळे त्या शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरु होती.
भाजपकडून पंकजा मुंडे या बीडमधून निवडणूक लढवणार आहेत. पंकजा मुंडेंची उमेदवारी जाहीर होताच बजरंग सोनावणे यांनी शरद पवार गटात प्रवेश केला. त्यांना शरद पवार गटाकडून तिकीटही मिळू शकते. पण आता ज्योती मेटे यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. त्यामुळे आता देवेंद्र फडणवीस कोणता निर्णय घेतात हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.