Politics News । विधानसभा निवडणुकांची (Assembly elections) धामधूम सुरू असून, मुंबईतील (Mumbai) वरळी विधानसभा मतदारसंघात (Varali Assembly Constituency) मोठ्या राजकीय घडामोडीची शक्यता आहे. शिवसेनेचे आदित्य ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अमोल मिटकरी यांच्यात कडवट संघर्ष होण्याची अटकळ आहे. अजित पवार गटाकडून अमोल मिटकरी यांच्या उमेदवारीसाठी तयारी सुरू झाल्याचे दिसते. तर महाविकास आघाडी आदित्य ठाकरे यांना वरळीतील उमेदवारी देण्याची दाट शक्यता आहे.
२०१९ मध्ये आदित्य ठाकरे यांनी पहिल्यांदाच निवडणूक लढवून सुरेश माने यांना पराभूत केले होते. ठाकरे यांना त्या वेळेस ८९,२४८ मतं मिळाली होती, तर माने यांना २१,८२१ मतं मिळाली होती. सध्याच्या निवडणुकीत देखील महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना होईल असे दिसते.
Breaking News । ब्रेकिंग न्युज! बदलापूर अत्याचार प्रकरणी महाराष्ट्र बंदची हाक
वरळीतील पोस्टर्समध्ये अमोल मिटकरींच्या समर्थनार्थ ‘प्रखर वकृत्व, सामान्य माणसांची पसंत’ अशा घोषणांचा उल्लेख आहे. त्यामुळे आगामी निवडणुकांमध्ये आदित्य ठाकरे विरुद्ध अमोल मिटकरी यांचा सामना रंगणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
Thane Hit and Run Case । ठाण्यातील हिट अँड रनचा धक्कादायक व्हिडिओ व्हायरल, अनेकांना कारने चिरडले