
Breaking News । बदलापूरमध्ये दोन चिमुकल्या मुलींवर झालेल्या अमानुष अत्याचाराने महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे. शाळेतील स्वच्छता कर्मचाऱ्याने शाळेच्या स्वच्छतागृहात तीन ते चार वर्षांच्या मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याचे उघडकीस आल्याने या घटनेची तीव्र प्रतिक्रिया उमटली आहे. संतप्त नागरिकांनी बदलापूर शहरात जोरदार आंदोलन केले असून, त्यांनी बदलापूर रेल्वे स्टेशनवर रेल्वे रोको आंदोलन केले. या आंदोलनामुळे 11 तासांहून अधिक वेळ वाहतूक ठप्प झाली.
Thane Hit and Run Case । ठाण्यातील हिट अँड रनचा धक्कादायक व्हिडिओ व्हायरल, अनेकांना कारने चिरडले
घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीने राज्यभरात येत्या 24 तारखेला महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. राज्यभरातून या बंदला व्यापक प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे. आघाडीच्या सर्व पक्षांनी सरकारवर तीव्र टीका केली आहे, विशेषतः मुलींच्या सुरक्षिततेचा मुद्दा उचलून धरला आहे.
दरम्यान, कल्याण वकील संघटनेने आरोपी अक्षय शिंदेचे वकीलपत्र घेण्यास नकार दिला आहे. संघटनेच्या बैठकीत हा निर्णय घेतला गेला असून, आरोपीला सरकारकडून वकीलपत्र मिळावे, अशी मागणी संघटनेने केली आहे. तसेच, संघटनेने स्पष्ट केले आहे की, आरोपीच्या विरोधात ते मोफत केस लढवणार आहेत. आंदोलकांच्या अटकेबाबतही वकील संघटना मोफत कायदेशीर मदत देणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
Gautami Patil । मोठी बातमी! गौतमी पाटील अहमदनगर कोर्टात हजर, नेमकं प्रकरण काय?
या प्रकरणामुळे राज्यभरात जनतेचा संताप उफाळून आला असून, आरोपीला कठोर शिक्षा मिळावी, अशी मागणी जोर