Politics News | जयंत पाटील-जितेंद्र आव्हाड शरद पवार गटाची साथ सोडणार असल्याच्या चर्चा; आव्हाडांनी स्पष्टच सांगितले म्हणाले…

Talks that Jayant Patil-Jitendra Awad will leave the Sharad Pawar group; Awhad clearly said...

Politics News | अमित शहा काल पुणे दौऱ्यावर होते. (Amit Shah on Pune visit) यावेळी त्यांनी केंद्रीय सहकार विभागाच्या कार्यालयाच्या डिजिटल पोर्टलचे उद्घाटन केले. अमित् शहा पुणे दौऱ्यावर असतानाच राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी अमित शहा यांची भेट घेतल्याच्या जोरदार चर्चा रंगल्या. त्याचबरोबर जयंत पाटील लवकर अजित पवार गटात सामील होणार असल्याच्या देखील चर्चा होत आहेत. त्याचबरोबर फक्त जयंत पाटीलच नाही तर जितेंद्र आव्हाड यांचेही नाव चर्चेत आहे. याबाबत जितेंद्र आव्हाड यांनी एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना सविस्तर प्रतिक्रिया दिली आहे.

Havaman Andaj । राज्यात किती दिवस पावसाची उघडीप? हवामान विभागाने दिली महत्त्वाची माहिती

अजित पवार (Ajit Pawar) गटासोबत तुम्ही जाणार असलेल्या चर्चा सुरू आहेत यावर तुमचं म्हणणं काय? असा प्रश्न विचारताच जितेंद्र आव्हाड (Jitendra Awad) म्हणाले, माझं नाव चर्चेत असू शकत नाही मी कायम शरद पवार यांच्यासोबत आहे असं ते म्हणाले आहेत. त्याचबरोबर जयंत पाटील असू द्या किंवा मी स्वतः असू द्या आम्ही शरद पवार यांच्या सोबतच राहील मरेपर्यंत मी शरद पवार यांच्यासोबतच राहील असे देखील आव्हाडांनी सांगितल आहे. याबाबत जितेंद्र आव्हाड यांनी एक ट्विट देखील केले आहे.

Share Market । गुंतवणूकदारांनो, ‘या’ महत्त्वाच्या शेअर्सवर ठेवा लक्ष; काय सांगतात तज्ञ? जाणून घ्या

पाहा जितेंद्र आव्हाड यांचे जशेच्या तशे ट्विट

राष्ट्रवादीचे प्रांताध्यक्ष श्री.जयंतजी पाटील साहेब यांच्याबद्दल संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न काही जणांकडून केला जात आहे.जाणून बुजून ते कोणाला तरी भेटून आले,ते मंत्री होणार,त्यांनी गावातून लोक बोलावली,अशा प्रकारच्या बातम्या पेरण्यात येत आहेत.ही पेरणी कशासाठी केली जातेय,हे आम्हांला बरोबर समजतंय.

जयंत पाटील यांच्यासोबत माझं वैयक्तिक बोलण झालं. पण त्यांनी स्पष्टपणाने सांगितलं की,” जितेंद्र साहेबांनी ईशारा दिलेला आहे लढायचंय. आणि आता थांबणे नाही.”मला वाटत नाही की,प्रत्येक नेत्याने दररोज येऊन सांगावं की,”आम्ही लढणार आहोत,आम्ही लढणार आहोत.” आम्ही मागेच सांगितल आहे की, “आम्ही पवार साहेबांच्या खांद्याला खांदा लावून लढणार आहोत.” त्या भूमिकेत काहीच फरक पडणार नाही.

Sharad Pawar । मोठी बातमी! शरद पवार गटाची केंद्रीय निवडणूक आयोगाकडे धाव, केली मोठी मागणी

तेव्हा कृपया ह्या अशा अफवांवर विश्वास ठेवू नका.आमचं ठरलंय,आम्ही लढणार म्हणजे लढणारच. लोकशाहीचं पवित्र मंदिर वाचवणे ही काळाची गरज आहे. आणि ते जर आम्ही केलं नाही तर, पुढची पिढी आम्हांला कधीच माफ करणार नाही.

सत्ता येते जाते, पण डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधानातून निर्माण झालेली संसदीय लोकशाही वाचली नाही, तर पुढची पिढी आम्हांला कधीचं क्षमा करणार नाही. असे ट्विट जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे.

Ajit Pawar । भाषण सुरु असताना अजितदादा असे काय म्हणाले की, अमित शहांना हसू आवरेना

Spread the love