Politics News । भाजपला मोठा धक्का देण्याच्या तयारीत शरद पवार, हा बडा नेता राष्ट्रवादीत येणार

Devendr Fadanvis And Sharad Pawar

Politics News । राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार पक्ष) अध्यक्ष शरद पवार भाजपला मोठा धक्का देण्याच्या तयारीत आहेत. उदगीरचे भाजपचे माजी आमदार सुधाकर भालेराव 11 जुलै रोजी शरद पवार यांच्या पक्षात प्रवेश करणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळत आहे.

Ashok Chavan । भाजपमध्ये येण्याच्या प्रश्नावर अशोक चव्हाणांचं मोठं वक्तव्य

2024 च्या लोकसभा निवडणुकीत राज्यातील महाविकास आघाडीने महायुतीला मोठा धक्का दिला आहे. यानंतर उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी भाजपला पराभूत करण्यासाठी मोहीम सुरू केली आहे. छत्रपती संभाजीनगरच्या शिवसंकल्प यात्रेत उद्धव ठाकरे यांनी माजी उपमहापौर आणि काही नगरसेवकांना आपल्या पक्षात समाविष्ट करून भाजपला धक्का दिला होता. आता शरद पवार मराठवाड्यात भाजपला आणखी एक धक्का देणार असल्याचे दिसत आहे.

Ajit Pawar । मोठी बातमी! महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी अजित पवारांचा अजेंडा निश्चित!

सुधाकर या जागेवरून निवडणूक लढवू शकतात

वृत्तानुसार, भाजपचे माजी आमदार सुधाकर भालेराव हे 11 जुलै रोजी मुंबईत शरद पवार, जयंत पाटील आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत त्यांच्या काही समर्थकांसह पक्षात प्रवेश करणार आहेत. उदगीर विधानसभा मतदारसंघात राज्याचे क्रीडामंत्री संजय बनसोडे यांच्या विरोधात महाविकास आघाडीचे सुधाकर भालेराव हे निवडणूक लढविण्याची शक्यता आहे.

Bjp । भाजपला सर्वात मोठा धक्का, माजी गृहमंत्र्यांनी सर्व पदांचा दिला राजीनामा

Spread the love