Bjp । भाजपला सर्वात मोठा धक्का, माजी गृहमंत्र्यांनी सर्व पदांचा दिला राजीनामा

BJP

Bjp । महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपला मोठा धक्का बसला आहे. माजी गृहराज्यमंत्री डॉ.माधव किन्हाळकर यांनी भाजपचा निरोप घेतला आहे. किन्हाळकर यांनी आपला राजीनामा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे पाठवला आहे. मराठवाड्यातील नांदेड जिल्ह्यात भाजपसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.

Ashok Chavan । भाजपमध्ये येण्याच्या प्रश्नावर अशोक चव्हाणांचं मोठं वक्तव्य

वृत्तानुसार, गेल्या महिनाभरात मराठवाड्यात नांदेड जिल्ह्यात भाजपला जोरदार झटका बसला आहे. भाजप सोडल्यानंतर सूर्यकांत पाटील यांनी खासदार अशोक चव्हाण यांच्यावर टीका केली. त्यानंतर आता माजी गृह राज्यमंत्री डॉ.माधव किन्हाळकर यांनी आज भाजपच्या सर्व पदांचा राजीनामा दिला आहे. भोकर मतदारसंघाची जबाबदारी माधव किन्हाळकर यांच्याकडे होती. अशा स्थितीत भाजपसाठी सूर्यकांत पाटील यांच्यानंतर हा दुसरा धक्का मानला जात आहे.

Ajit Pawar । मोठी बातमी! महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी अजित पवारांचा अजेंडा निश्चित

शरद पवार यांच्या मंत्रिमंडळात मंत्री राहिले आहेत

डॉ. माधव किन्हाळकर यांनी भोकर (विधानसभा मतदारसंघ) येथून अमिता अशोकराव चव्हाण यांच्या विरोधात भाजपचे उमेदवार म्हणून २०१४ ची निवडणूक लढवली होती. त्यावेळी 53,224 मते मिळवून त्यांचा पराभव झाला होता. 1991 ते 1999 या काळात त्यांनी भोकर मतदारसंघातून काँग्रेसचे विधानसभेचे सदस्य म्हणून काम केले. 1991 ते 1995 या काळात शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र सरकारमध्ये त्यांनी गृह, महसूल आणि सहकार राज्यमंत्री म्हणून काम पाहिले.

Ajit Pawar । अजित पवार पंढरपूर यात्रेत पायी चालणार; स्वतःच दिली माहिती

Spread the love