Politics News । ब्रेकिंग! महाविकास आघाडीचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला; पाहा कोणाला किती जागा मिळाल्या?

Politics News

Politics News । सध्या एक मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर आली आहे. महाविकास आघाडीच्या जागा वाटपाची माहिती एका मराठी वृत्तवाहिनीच्या हाती लागली आहे. माहितीनुसार, शिवसेना ठाकरे गट लोकसभेच्या 48 पैकी 23 जागांवर निवडणूक लढवणार आहे. त्यापैकी दोन जागा ठाकरे गट मित्र पक्षांना देणार असल्याची माहिती मिळत आहे. तर काँग्रेसला 15 ते 17 जागा मिळाल्याची माहिती मिळत आहे. तर राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाला 9 ते 11 जागा मिळणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

Ajit Pawar । बिग ब्रेकिंग! शिंदे गटाचा बडा नेता अजित पवार गटात जाणार?

सूत्रांच्या माहितीनुसार ठाकरे गट मुंबईमध्ये चार जागा लढवण्याच्या तयारीत आहे. तर शरद पवार गट  उत्तर मुंबईसाठी उत्सुक नसल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे उत्तर मुंबईची जागा कोण लढणार नसेल तर ठाकरे गट जागा लढणार असल्याची माहिती देखील सूत्रांनी दिली आहे.

Eknath Shinde । धक्कादायक बातमी! मुख्यमंत्री शिंदे यांच्या नावाने बनावट स्वाक्षरी आणि शिक्क्याचे प्रकरण, पोलीस टोळीच्या शोधात

महत्वाची गोष्ट म्हणजे वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडी सोबत आली तर अकोलेची जागा वंचित बहुजन आघाडीला देणार असल्याची देखील माहिती समोर आली आहे. त्याचबरोबर वंचित सोबत आल्यास त्यांना आणखी एक ते दोन जागा देण्याची शक्यता आहे. अशी माहिती सूत्रांकडून येत आहे.

Congress । काँग्रेसला सर्वात मोठा धक्का! सहा आमदार अपात्र, विधानसभा अध्यक्षांची मोठी कारवाई? राजकारणात मोठी खळबळ

Spread the love