Beed News । धक्कादायक! बीडमध्ये महिलेला सरपंचासह १० जणांनी केली बेदम मारहाण

Beed News

Beed News । बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई तालुक्यात एक धक्कादायक आणि संतापजनक घटना घडली आहे. सेनगाव या गावात ध्वनी प्रदूषणाविरोधात तक्रार केल्याच्या रागातून एका महिला वकिलाला बेदम मारहाण करण्यात आली आहे. ही घटना १४ एप्रिल रोजी घडली असून, आरोपींमध्ये गावचे सरपंचही सामील आहेत.

Shrigonda News l श्रोगोंद्यात संत शेख महंमद महाराजांच्या समाधीस्थळी मंदिर की दर्गाह? – नवा वाद चिघळला

पीडित महिलेचं नाव ज्ञानेश्वरी असून, त्या गेल्या काही महिन्यांपासून गावातील मंदिरांमधून होणारा मोठा आवाज आणि गिरण्यांमुळे निर्माण होणाऱ्या ध्वनी प्रदूषणाविरोधात संबंधित अधिकाऱ्यांकडे तक्रारी करत होत्या. मात्र, या तक्रारी काही लोकांच्या नाराजीस कारणीभूत ठरल्या आणि याच रागातून त्यांच्यावर हल्ला झाला.

ज्ञानेश्वरी यांच्यावर १० जणांनी एकत्र येऊन लाकडी काठ्या, रबरी पाईप आणि इतर साधनांनी अमानुष मारहाण केली. त्यांच्या शरीरावर काळे-निळे व्रण स्पष्टपणे दिसत असून, त्या काही वेळासाठी बेशुद्ध अवस्थेत होत्या. मदतीसाठी कोणीही पुढे आलं नाही, ही बाब अधिक दु:खद आहे.

Ranjit Kasle Dismissed l सर्वात मोठी बातमी! रणजित कासलेंना मोठा झटका, पोलिसांनी उचलल मोठं पाऊल

ही घटना समोर आल्यानंतर वडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, मारहाण करणारे सर्व आरोपी सध्या फरार आहेत. ज्ञानेश्वरी यांनी सरकारकडे सुरक्षेची मागणी केली असून, आरोपींवर हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करून त्यांना जामीन नाकारावा, अशी मागणी केली आहे. तसंच, सरपंचाचं पद रद्द करण्यात यावं आणि कठोर कायदेशीर कारवाई व्हावी, अशीही त्यांची स्पष्ट भूमिका आहे.

या घटनेने राज्यभरात संतापाचं वातावरण निर्माण झालं असून, अनेक सामाजिक कार्यकर्ते, नेते आणि नागरिक तत्काळ अटकेची मागणी करत आहेत. पोलीस प्रशासनाकडूनही योग्य ती कारवाई करण्यात येईल, असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला आहे.

Jayakwadi dam water Level । जायकवाडी धरणात पाण्याचा साठा कमी; बाष्पीभवनामुळे टंचाईचा धोका

Spread the love