
Politics News । शिंदे गटाच्या सोळा आमदारांच्या अपात्रतेबाबतची सुनावणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर सुरू आहे. सध्या या प्रकरणी एक मोठी अपडेट समोर आली आहे. या आमदारांनी सहा हजार पानांचे उत्तर विधानसभा अध्यक्षांना दिले असल्याची माहिती समोर आली आहे. त्याचबरोबर यामध्ये त्यांनी भक्कम पुरावे देखील दिले आहेत सध्या या पुराव्यांची छाननी सुरू आह. त्यामुळे आता सगळ्यांच्या नजरा या कार्यवाहीकडे लागल्या आहेत.
शिवसेनेच्या उत्तरातील ठळक मुद्दे काढण्यास विधिमंडळाकडून सुरुवात करण्यात आली आहे. शिंदे गटाच्या आमदाराकडून विधानसभा अध्यक्ष यांच्याकडे सहा हजार पाणी उत्तर दाखल करण्यात आल आहे. उर्वरित काही पुरावे प्रत्यक्ष सुनावणी मध्ये सादर करणार असल्याचे देखील काही आमदारांनी म्हटलं आहे. अशी माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे. (Politics News)
दरम्यान, मागच्या अनेक दिवसापासून अपात्र आमदारांच्या कार्यवाहीवर सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत. यावर आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. याबाबत बोलताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, राहुल नार्वेकर उत्तम वकील आहेत त्यांना कायद्याचं ज्ञान उत्तम आहे. त्यामुळे ते योग्य निर्णय देतील आणि नियमानुसार निर्णय देतील ते कधीच चुकीचा निर्णय देऊ शकत नाही. असे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले आहेत.
नियमानुसार कारवाई होणार
त्याचबरोबर या संपूर्ण प्रकरणावर विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. याबाबत बोलताना राहुल नार्वेकर म्हणाले, “आम्ही कारवाई सुरू केली आहे त्यामुळे याबाबत चर्चा न करता योग्य कायदेशीर आणि नियमानुसार कारवाई करू अस आश्वासन राहुल नार्वेकर यांनी दिले आहे. मात्र या संपूर्ण प्रकारचा निकाल कधी लागेल याबाबत त्यांनी कोणतीही माहिती दिलेली नाही”.
Government Contractor । सरकारी कंत्राटदार व्हायचंय? जाणून घ्या परवाना प्रक्रिया आणि अर्ज पद्धत