Success Story । सरकारी नोकरीला रामराम ठोकत पठ्ठ्यानं केली कोरफडीची शेती, आता करतोय कोट्यवधी रुपयांची उलाढाल

Patthya farmed aloe vera while trying to get a government job, now he is making a turnover of crores of rupees.

Success Story । सध्याच्या काळात अनेक तरुण शेतकरी शेतीत (Agriculture) नवनवीन प्रयोग करत आहेत. त्यापैकी अनेकांचा कल पारंपारिक शेती सोडून आधुनिक शेतीकडे (Modern agriculture) आहे. कारण मेहनत केली तर आधुनिक शेतीमध्ये जास्त पैसे कमावता येतात. सर्वात महत्त्वाचे म्हणजे अनेक उच्चशिक्षीत तरुण लाखो रुपयांची नोकरी सोडून शेती करत लाखो रुपयांची कमाई करत आहेत. (Latest Marathi News)

Petrol Price । सर्वसामान्यांसाठी आनंदाची बातमी! पेट्रोलचे दर होणार कमी, सरकारचा मोठा निर्णय

राजस्थानमध्ये राहणारा तरुण हरीश धनदेव हा सरकारी अभियंताची नोकरी सोडून कोरफडीची शेती (Aloe vera cultivation) करत आहे. याच्या माध्यमातून तो आज करोडो रुपयांची उलाढाल करत आहे. दरम्यान, तो यापूर्वी जैसलमेर नगरपरिषदेत कनिष्ठ अभियंता म्हणून काम करत होता, परंतु घरापासून लांब राहत असलेल्या या तरुणाला वडिलोपार्जित शेतीत काही तरी नवीन प्रयोग करायचा होता.

Agriculture News । अनेक उपाय करूनही जनावर गाभण राहत नाही? हा घरगुती उपाय येईल कामी

कृषी प्रदर्शनादरम्यान मिळाली प्रेरणा

नोकरी करत असताना ते दिल्लीला गेले होते त्यावेळी त्या ठिकाणी त्यांना एका कृषी प्रदर्शनादरम्यान कोरफड (Aloe vera) लागवडीबद्दलची माहिती मिळाली. त्यांनी सरकारी नोकरी सोडून कोरफड लागवड करण्याचा निर्णय घेतला. गावी आल्यानंतर त्यांनी 120 एकर जमिनीवर कोरफडीची लागवड केली. ब्राझील, हाँगकाँग आणि अमेरिका यांसारख्या मोठ्या देशांमध्ये मोठ्या प्रमाणात मागणी असणाऱ्या बार्बी डेनिस या एकच कोरफडीच्या जातीची ते लागवड करतात.

Asia Cup 2023 । जाहीर झाला आशिया कपचा संघ, कोणाला मिळाली संधी? जाणून घ्या

इतकेच नाही तर त्यांनी जैसलमेर जिल्ह्यात Naturalo Agro नावाची कंपनी सुरू केली असून त्यांच्या उत्पादनांना देशांत चांगली मागणी आहे. 2 ते 3 कोटी रुपयांची त्यांची वार्षिक उलाढाल आहे. सोडलेल्या नोकरीचे फलित झाल्याचं समाधान ते व्यक्त करत आहेत.

Maharashtra Rain Update । विदर्भात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा, जाणून घ्या हवामान विभागाचा अंदाज

Spread the love