Sharad Pawar । राजकारणातून मोठी बातमी! शरद पवारांचा मोठा गेम

Sharad Pawar

Sharad Pawar । सध्या सर्वत्र लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी (Loksabha election) सुरु आहे. अनेक पक्ष त्यांच्या उमेदवारांची घोषणा करत आहेत. शरद पवार यांचा पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) ने महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली असून बीडमधून बजरंग सोनवणे (Bajrang Sonawane) यांना तिकीट देण्यात आले आहे.

Maharashtra Politics । सर्वात मोठी बातमी! नाशिकमध्ये येणार राजकीय भूकंप? अखेर तो दिवस आलाच

बजरंग सोनवणे यांनी नुकताच अजित पवार यांच्या गटाला जोरदार धक्का देत शरद पवार गटात प्रवेश केला. बीडमधून भाजपच्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) या उमेदवार आहेत. (Bajrang Sonawane vs Pankaja Munde) त्यामुळे बीडमध्ये यंदा खूप अटीतटीची लढत पार पडणार आहे. अटीतटीच्या लढतीत कोणाचा विजय होणार याकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Muralidhar Mohol । मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारासाठी भाजपचा ‘मास्टर प्लॅन’, आखली विशेष रणनीती

दरम्यान, बीडमध्ये शिवसंग्राम संघटनेच्या प्रमुख ज्योती मेटे यांना उमेदवारी मिळेल अशी शक्यता होती. पण अचानक त्यांचं तिकीट कापले आहे. अशातच आता ज्योती मेटे यांनी मोठा निर्णय घेतला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, ज्योती मेटे अपक्ष उमेदवारी लढण्याच्या तयारीत आहेत. यासंदर्भात लवकरच त्या कार्यकर्त्यांशी भेट घेऊन आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत.

Rashmi Barve । “भाजपच्या वरिष्ठ नेत्याकडून माझं नैतिक वस्त्रहरण”; रश्मी बर्वेंचा सर्वात गंभीर आरोप

Spread the love