Rashmi Barve । “भाजपच्या वरिष्ठ नेत्याकडून माझं नैतिक वस्त्रहरण”; रश्मी बर्वेंचा सर्वात गंभीर आरोप

Rashmi Barve

Rashmi Barve । नागपूर : जात प्रमाणपत्र अवैध असल्याने रामटेकच्या काँग्रेस (Congress) उमेदवार रश्मी बर्वे यांचा उमेदवारी अर्ज रद्द झाला होता. अशातच आता याच कारणामुळं त्यांचं जिल्हा परिषद सदस्यत्व रद्द झाला आहे. रश्मी बर्वे यांना सर्वात मोठा दुसरा झटका बसला आहे. उमेदवारी अर्ज रद्द झाल्यानंतर रश्मी बर्वेंनी भाजपच्या (BJP) वरिष्ठ नेत्यावर निशाणा साधला आहे. (Latest marathi news)

Beed Loksabha । बीडमध्ये राजकीय हालचालींना वेग, ज्योती मेटेंनी लोकसभेपूर्वी घेतला मोठा निर्णय

कारवाईनंतर रश्मी बर्वेंनी पत्रकार परिषद (Press conference by Rashmi Barve) घेतली. त्यावेळी त्या म्हणाल्या की, “भाजपच्या एका बड्या नेत्यानं माझं नैतिक वस्त्रहरण करण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी नागपुरमध्ये भाजपचा दुसरा मोठा नेता धृतराष्ट्राची भूमिका बजावत दुर्लक्ष करत होता. भाजपचा तो मोठा नेता नेहमीच सत्याच्या बाजूनं उभा राहतो. पण माझ्यावर अन्याय होत असताना आपल्या पक्षाच्याच बाजूने उभा राहिला.”

Sharad Pawar । बिग ब्रेकिंग! शरद पवारांनी जाहीर केली दुसरी यादी; पाहा कोणत्या नेत्यांना मिळाली संधी

“त्या आंधळ्या, मुक्या आणि बहिऱ्या नेत्यापासून माझा भ्रमनिरास झाला. त्याची अन्यायग्रस्तांच्या पाठीशी उभा राहतो अशी प्रतिमा होती,” असा आरोप रश्मी बर्वे यांनी केला. दरम्यान, रश्मी बर्वे यांनी कोणाचेच नाव घेतलं नाही त्यामुळे नैतिक वस्त्रहरण करणारा भाजपचा तो नेता कोण? अशा चर्चांना राजकीय वर्तुळात उधाण आलं आहे.

Ajit Pawar । भाजपला मोठा धक्का, भाजप आमदाराच्या पत्नीने अजित पवारांच्या पक्षात केला प्रवेश

Spread the love