Palghar Accident । हृदयद्रावक अपघात! दुचाकीची रिक्षाला धडक, शाळकरी विद्यार्थिनीचा जागीच मृत्यू तर ६ गंभीर जखमी

Palghar Accident

Palghar Accident । सध्या पालघरमधून अपघाताची एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. दुचाकी आणि रिक्षाची जोरदार धडक झाल्याची माहिती मिळत आहे. हा अपघात एवढा भीषण होता की या अपघातामध्ये एका शाळकरी विद्यार्थिनीचा मृत्यू झाला आहे तर ६ जण गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. अपघातात रिक्षाचा चक्काचूर झाला आहे.

India Post Recruitment 2024 । दहावी पास असणाऱ्यांसाठी मोठी सुवर्णसंधी! पोस्ट ऑफिसमध्ये 35 हजार पदांसाठी भरती

सूत्रांच्या माहितीनुसार, डहाणू-जव्हार महामार्गावर ही घटना घडली आहे. सकाळी ११ च्या सुमारास बाईक आणि रिक्षाची समोरासमोर धडक होऊन हा अपघात झाला आहे. या अपघातात आठवीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थिनीचा मृत्यू झाला आहे. या अपघातामुळे तेथील परिसरात मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

Bhushi Dam Tragedy । लोणावळ्यातील हृदयद्रावक अपघातावर मंत्री अनिल पाटील यांचे मोठे वक्तव्य; म्हणाले…

या अपघातातील जखमी झालेल्या लोकांना तातडीने रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे. जखमींची प्रकृती गंभीर असल्याचे त्यांना धुंदलवाडी येथील वेदांत हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. सध्या जखमी लोकांवर रुग्णालयामध्ये उपचार सुरु आहेत.

Eknath Shinde । मुख्यमंत्री शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर साधला निशाणा; म्हणाले…

Spread the love