एका नवविवाहित स्त्रीने लग्नाला फक्त तीनच दिवस झाले होते, आणि तिच्या पतीची हत्या केल्याची घटना समोर आली आहेत. ही धक्कादायक घटना बिहारच्या (Bihar) गया (Gaya) जिल्ह्यात घडली आहे. या स्त्रीने तिच्या नवऱ्याला असं सरप्राईज केलं की, त्या सरप्राईजने त्याचं जीवनच संपलं. त्या नवविवाहित स्त्रीने जे केलं त्याने सर्वांनाच धक्का बसला आहे. (On the third day of marriage, the wife killed her husband)
Accident | समृद्धी महामार्गावर पुन्हा एकदा भीषण अपघात; तीन जणांचा मृत्यू
बिहारमधील गया जिल्ह्यातील लकदही गावात राहणाऱ्या अशोक कुमार (Ashok Kumar) यांचा रेवती (Revati) सोबत 29 मे रोजी विवाह झाला होता. अशोक रेवतीला 30 मे रोजी घरी घेऊन आला होता. मृत्यू पावलेल्या अशोकची पत्नी रेवतीचे चुलत भाऊ उपेंद्र यादव याच्याबरोबर अनैतिक संबंध (Immoral relationship) होते. ही गोष्ट अशोकला समजली होती. चौकशी दरम्यान रेवतीने हे सत्य सांगितले आहे.
रेवतीने सांगितल्याप्रमाणे, तिने हा खून तिच्या मावस मेहुण्याला करण्यास सांगितला होता. कारण तिच्या पतीला तिच्या अनैतिक संबंधांबद्दल सर्व समजलं होतं. एसपी आशिष भारती (SP Ashish Bharati) यांच्या माहितीनुसार, अशोकचा मृतदेह 1 जूनला सापडला आहे. त्यासोबतच 6 जूनला रेवतीचा मेहुना उपेंद्र यादव (Upendra Yadav) याचा देखील मृतदेह आमस पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये जेटी रोडजवळ सापडला आहे. उपेंद्र यादवची हत्या नेमकी कोणी केली याबद्दल पोलिसांची कसून चौकशी चालू आहे.
धक्कादायक घटना! भाजपचा कार्यक्रम होता अन् मंडप कोसळला, नितेश राणे थोडक्यात वाचले