सध्या उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) मुरादाबाद येथील एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये मुलगी तिच्या हिंदू मित्रासोबत दुचाकीवरून कुठेतरी जात होती. त्यानंतर एक तरुण त्यांच्या मागे लागला. त्यानंतर दोघेही पुढे जात असताना थांबले असता त्याने मुलीला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्याचबरोबर व्हिडीओ देखील बनवला.
लग्नाला अवघे तीनच दिवस झाले, अन् बायकोने केला नवऱ्याचा खून; घटनेचे कारण ऐकून तुम्हालाही बसेल धक्का
व्हिडिओ बनवणाऱ्या तरुणाने मुलीला विचारले की, तू या हिंदू मुलासोबत का जात आहेस? तुला दुसरे कोणी सापडले नाही का? यावर मुलीने उत्तर दिले की तो माझा मित्र आहे, माझा भाऊ आहे. मात्र त्या तरुणाने तिला पुन्हा पुन्हा टोमणे मारायला सुरुवात केली. बाईक चालवणाऱ्या मुलानेही सांगितले की तो मुलीच्या कुटुंबाला ओळखतो आणि मुलीचे कुटुंब त्याच्या ओळखीचे आहे.
पुण्यामध्ये भंगार दुकानाला लागली भीषण आग! संपूर्ण परिसरात धुराचे सावट
मात्र असे असूनही तो तरुण काही ऐकायला तयार नव्हता. तो मुलीला म्हणाला की, आजच्या काळात काय चालले आहे ते तुला माहीत नाही? तरुणाचे हे गैरवर्तन पाहून मुलीने तत्काळ वडिलांना फोन करून सर्व प्रकार सांगितला. त्यानंतर मुलीचे वडील स्वत: व्हिडिओ बनवणाऱ्या तरुणाशी बोलले, त्यानंतर हे प्रकरण मिटले.