Odisha Bus Accident News । प्रवाशांनी खचाखच भरलेल्या बसचा भीषण अपघात; पाहा व्हिडीओ

Odisha Bus Accident News

Odisha Bus Accident News । सध्या अपघाताची एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. चालकाला डुलकी लागल्याने प्रवाशांनी खचाखच भरलेली बस थेट उड्डाणपुलावरून खाली कोसळली आणि भीषण अपघात झाला आहे. ओडिशाच्या जाजपूर जिल्ह्यात सोमवारी संध्याकाळी राष्ट्रीय महामार्ग-16 वर हा अपघात झाला आहे. हा अपघात एवढा भीषण होता की या अपघातामध्ये ५ प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला. तर अनेकजण जखमी झाले आहेत.

Sunetra Pawar । सुनेत्रा पवार रडल्या अन् शरद पवारांनी दिलं त्या वक्तव्याच स्पष्टीकरण; म्हणाले…

अपघाताची माहिती मिळताच जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. महिला आणि मुलांसह सुमारे 55 प्रवाशांना घेऊन ही बस पश्चिम बंगालच्या पूर्व मेदिनीपूर जिल्ह्यातील हल्दियाला जात होती. रात्री 8 च्या सुमारास रसूलपूर परिसरातील जाजपूर येथील बाराबती चौकाजवळील ओव्हरब्रिजवरून बस चालकाचे नियंत्रण सुटले आणि गाडी खाली कोसळली.

Sharad Pawar । राजकारणातून मोठी बातमी समोर! शरद पवार यांची मोठी खेळी; महायुतीला बसणार धक्का?

अपघाताची माहिती मिळताच रसूलपूर आणि चंडीखोल अग्निशमन केंद्रातील अग्निशमन दलाच्या जवानांनी तात्काळ अपघातस्थळी पोहोचून स्थानिक लोकांच्या मदतीने अपघातग्रस्तांची सुटका केली. अग्निशमन दलाच्या जवानांनी गॅस कटरच्या सहाय्याने बसमधून जखमींना बाहेर काढले. बचाव कार्यात 16 रुग्णवाहिका आणि क्रेनचा वापर करण्यात आला.

Manoj Jarange Patil । धक्कादायक बातमी! मनोज जरांगे पाटील यांच्या सहकाऱ्यावर दगडफेक

Spread the love