OBC Reservation । ब्रेकिंग! ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंनी सोडलं आमरण उपोषण

OBC Reservation

OBC Reservation । मागच्या दहा दिवसांपासून OBC आरक्षणाला धक्का लागू नये, या मागणीसाठी प्राध्यापक लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे उपोषणाला बसले होते. सध्या ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी आपले उपोषण संपवले आहे. हाके दहा दिवसांपासून उपोषणाला बसले होते. आज त्यांनी पाणी पिऊन उपोषण संपवले. महाराष्ट्र सरकारच्या वतीने लक्ष्मण हाके यांना त्यांच्या सर्व मागण्यांवर राज्य सरकार सकारात्मक चर्चा करत असल्याचे लेखी आश्वासन देण्यात आले आहे.

Salman Khan । सलमान खान गोळीबार प्रकरणात धक्कादायक माहिती समोर!

सरकारच्या शिष्ट मंडळाने आज त्यांची भेट घेतल्यानंतर लक्ष्मण हाके यांनी उपोषण मागे घेतलं. आंदोलनाला आलेल्या आजीच्या हातून पाणी पिऊन त्यांनी उपोषण सोडलं. सरकारच्या शिष्टमंडळामध्ये पाच मंत्र्यांसह १२ जणांचा समावेश आहे. लक्ष्मण हाके यांच्या काही मागण्या सरकारने मान्य केल्या

Assembly Election 2024 । ‘शरद पवारांनी असं वक्तव्य केलं असेल तर…’, काँग्रेस नेते नाना पटोले यांनी जागावाटपाबाबत मोठे वक्तव्य

काही मागण्यांबाबत निर्णय घेण्यात आल्याचे सरकारने सांगितले. काही मागण्यांबाबत निर्णय होणे बाकी आहे. प्रलंबित मागण्यांवर तोडगा काढण्यासाठी पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या आठवड्यात सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. आरक्षणाच्या बाबतीत ओबीसी समाजाच्या हिताशी कोणतीही तडजोड होणार नाही याची काळजी राज्य सरकार घेईल, असे आश्वासनही यावेळी देण्यात आले.

Raigad News । कॉलेजचे मित्र गेले ट्रेकिंगला, मात्र घडलं भयानक; ४ विद्यार्थ्यांचा नदीत बुडून मृत्यू

Spread the love