Salman Khan । सलमान खान गोळीबार प्रकरणात धक्कादायक माहिती समोर!

Salman Khan

Salman Khan । बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या घरावर झालेल्या गोळीबारप्रकरणी मोठी बातमी समोर येत आहे. या घटनेमागील गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ अनमोल बिश्नोईविरोधात मुंबई पोलिसांना सर्वात मोठा पुरावा मिळाला आहे. आरोपींकडून सापडलेले अनमोल बिश्नोईचे ऑडिओ रेकॉर्डिंग एजन्सीकडे ठेवलेल्या अनमोल बिश्नोईच्या ऑडिओ नमुन्याशी जुळले.

Rohit Pawar । छगन भुजबळांसह हे आमदार अजित पवारांची साथ सोडणार? रोहित पवार यांचा धक्कादायक दावा

गोळीबाराची घटना घडल्यानंतर मुंबई गुन्हे शाखेने या प्रकरणी गुजरातमधून विकी गुप्ता आणि सागर पाल यांना अटक केल्याचे सूत्रांनी सांगितले. तपासादरम्यान, अनमोल बिश्नोई गोळीबार केल्यापासून ते लपून राहण्यापर्यंत सतत गोळीबार करणाऱ्यांच्या संपर्कात होता, असे उघड झाले असून, त्याच्या आणि अनमोल बिश्नोई यांच्यातील संभाषणाचे ऑडिओ त्याच्या मोबाईलवरून पोलिसांना मिळाले होते .

Ajit Pawar । सर्वात मोठी बातमी! अजित पवारांना बसणार मोठा धक्का? छगन भुजबळ सोडणार साथ?

पोलिसांना महत्त्वाचे पुरावे सापडले

एका अधिकाऱ्याने सांगितले की, हा ऑडिओ अनमोल बिश्नोईचा आहे की अन्य कोणाचा, हे जाणून घेण्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणेकडून अनमोल बिश्नोईचे ऑडिओचे नमुने घेण्यात आले आणि दोन्ही नमुने फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवण्यात आले. तपासादरम्यान फॉरेन्सिक लॅबला कळाले की हा ऑडिओ फक्त अनमोल बिश्रोईचा आहे.

Sharad Pawar । शरद पवारांनी बारामतीत मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर केली सडकून टीका; म्हणाले…

Spread the love